Join us  

Video: "ही कुठल्या प्रकारची बॅटिंग..."; विंडिजच्या फलंदाजाचा शॉट पाहून विराटलाही हसू अनावर

विराटचा आवाज स्टंप माइक मध्येही स्पष्ट ऐकू आला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 5:02 PM

Open in App

Virat Kohli Trolls West Indies, IND vs WI Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानावरील त्याच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. संघ सामना जिंको वा हरो, तो कर्णधार असो वा नसो, पण विराटची शैली कधीच बदलत नाही. विराट सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे तिथे टीम इंडियाने डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे मालिकेतील पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. या दरम्यान, विराटशी संबंधित एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पहिल्या कसोटीत टीम इंडिया विजयाच्या अगदी जवळ असताना विराट कोहलीने विरोधी संघासोबत स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. तो मस्करीच्या मूडमध्ये होता. वेस्ट इंडिजच्या जोमेल वॅरिकनची फलंदाजी पाहून कोहलीने त्याची खिल्ली उडवली. भारताला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती. वॉरिकन खेळत होता. वॅरिकनला फिरकीपटूंचे चेंडू कळत नव्हते. प्रत्येक चेंडू तो हवेत खेळायचा प्रयत्न करत होता. रवींद्र जडेजाच्या षटकात वॅरिकनने एक विचित्र शॉट खेळला. त्यावर विराट हसला आणि लाइव्ह मॅचमध्ये म्हणाला- हा नक्की कुठल्या प्रकारची बॅटिंग करतोय? स्टंप माइकमध्ये विराटचा आवाज स्पष्ट ऐकू आला, ज्यामुळे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ-

भारताचा पहिल्या कसोटी दणदणीत विजय

डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीज संघाचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने 5 विकेट घेतल्या. यानंतर भारताने पहिला डाव 5 गड्यांच्या मोबदल्यात 421 धावा करून घोषित केला. पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने १७१ धावांची मौल्यवान खेळी केली. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कर्णधार रोहितने 103 आणि विराटने 76 धावा केल्या. अश्विनने दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्यामुळे विंडीजचा संघ केवळ 130 धावाच करू शकला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मायशस्वी जैस्वालरवींद्र जडेजा
Open in App