२० चौकार, ४ षटकार! मुंबईच्या फलंदाजाने चोपल्या नाबाद १६० धावा, शिवाय २ विकेट्सही घेतल्या

विनू मांकड ट्रॉफी स्पर्धेतील आजच्या सामन्यात मुंबईच्या मुशीर खानने ( Musheer Khan) अष्टपैलू कामगिरी करून चंडिगढ संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 07:56 PM2023-10-18T19:56:23+5:302023-10-18T19:57:49+5:30

whatsapp join usJoin us
VINOO MANKAD TROPHY- Musheer Khan vs Chandigarh : 160* off 130 balls with 20 fours & 4 sixes & take 2 wickets, Mumbai won by 8 wickets  | २० चौकार, ४ षटकार! मुंबईच्या फलंदाजाने चोपल्या नाबाद १६० धावा, शिवाय २ विकेट्सही घेतल्या

२० चौकार, ४ षटकार! मुंबईच्या फलंदाजाने चोपल्या नाबाद १६० धावा, शिवाय २ विकेट्सही घेतल्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

VINOO MANKAD TROPHY - विनू मांकड ट्रॉफी स्पर्धेतील आजच्या सामन्यात मुंबईच्या मुशीर खानने ( Musheer Khan) अष्टपैलू कामगिरी करून चंडिगढ संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. मुशीरने १० षटकांत ५७ धावा देताना २ विकेट्स घेतल्या आणि त्यात ३६ चेंडू निर्धाव फेकले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना कॅप्टन्स इनिंग्स खेळून १३० चेंडूंत २० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १६० धावा चोपल्या. मुंबईने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला.


प्रथम फलंदाजी करताना चंडिगढचा संपूर्ण संघ ४९.५ षटकांत २८२ धावांत तंबूत परतला. देवांग कौशिकने १०० चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. कर्णधार पारसनेही ६० चेंडूंत ५३ धावांची खेळी केली. आर्यन वर्मा ( ३४), इशान गाबा ( ४५) यांच्या उपयुक्त खेळीनंतर तळाला निशुंक बिर्लाने ३२ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून आयुष वर्तकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मुशीरने २, तर मोहम्मद सैफ, प्रेम, उमार खान व यासीन शेख यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.


प्रत्युत्तरात, मुशीरने एकट्याने सामना संपवला. त्याने सलामीला येताना नाबाद १६० धावा केल्या. आयुष म्हात्रेने २९ आणि आदित्य रावतने ३६ धावांचे योगदान दिल्यानंतर मनन भट्टने मुशीरला साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १६८ धावा जोडल्या. मननने नाबाद ५९ धावा केल्या. मुंबईने ४१.१ षटकांत २ बाद २८८ धावा करून विजय पक्का केला.
 

Web Title: VINOO MANKAD TROPHY- Musheer Khan vs Chandigarh : 160* off 130 balls with 20 fours & 4 sixes & take 2 wickets, Mumbai won by 8 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.