मुंबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या २०० व्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी कामगिरी करतानी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकवीरांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहलीने कारकिर्दीतील ३१ वे शतक झळकावताना आॅस्टेÑलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (३०) याला मागे टाकले. आता कोहलीच्या पुढे केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (४९) याचा क्रमांक आहे.
पाँटिंगने ३७५ एकदिवसीय सामने खेळताना ३० शतके झळकावली होती. त्याचवेळी, कोहलीपुढे असलेल्या सचिनने ४६३ सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिन, कोहली आणि पाँटिंग यांच्यानंतर सर्वाधिक शतक झळकावणाºया फलंदाजांच्या यादीमध्ये सनथ जयसूर्या (२८), हाशिम आमला (२६), एबी डिव्हिलियर्स (२५) आणि कुमार संगकारा (२५) यांचा क्रमांक आहे.
व्या वैयक्तिक एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा कोहली पहिला भारतीय, तर क्रिकेटविश्वातील दुसरा
फलंदाज ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा तुफानी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने असा पराक्रम केला होता.
गेल्या वर्षी केपटाऊन येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना एबीने आपल्या २०० व्या सामन्यात १०१ धावांची खेळी केली होती.
>कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध १००० धावांचा पल्लाही गाठला आहे. ही कामगिरी केवळ
१७ डावांमध्ये करताना कोहलीने डीन जोन्सचा (१९) विक्रमही मोडला. भारताकडून वीरेंद्र सेहवागने २१ डावांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जलद १००० धावा काढल्या होत्या.
कोहलीने श्रीलंका (२१८६), वेस्ट इंडिज (१३८७) आणि आॅस्टेÑलिया (११८२) यांच्याविरुद्धही हजारांहून अधिक धावा काढल्या आहेत. २०० एकदिवसीय सामने खेळणारा
कोहली १३ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला असून सर्वाधिक ४६३ एकदिवसीय सामने खेळण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
>भारताकडून २०० व्या सामन्यात याआधी सर्वोच्च वैयक्तिक खेळी युवराज सिंगच्या नावावर होती. युवीने आपल्या २०० व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अॅडलेड येथे ७६ धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमवर शतक झळकावणारा कोहली दुसरा भारतीय कर्णधारही ठरला आहे.