Join us  

विजयाने आरसीबीचे मनोधैर्य उंचावण्यास झाली मदत

वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला आश्चर्यकारकपणे पराभव स्वीकारावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 4:27 AM

Open in App

- सुनील गावसकर लिहितात...वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला आश्चर्यकारकपणे पराभव स्वीकारावा लागला. राजस्थान रॉयल्स आणि बेंगळुरू संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानांवर असल्यामुळे जास्तीत जास्त संघ त्यांना पराभूत करण्याबाबत विचार करतात. पण, टी२० क्रिकेटमध्ये तळाच्या स्थानावरील संघही त्यांचा दिवस असेल तर त्यांच्यापेक्षा तुलनेने वरच्या स्थानी असलेल्या संघाला चकित करू शकतात.आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले असून यानंतर कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील राहतील. पंजाब संघाविरुद्धची लढत बघितल्यानंतर जिंकण्यासाठी त्यांना लक्ष्याचा पाठलाग करणे आवश्यक ठरते. चहलचा अपवाद वगळता त्यांच्या संघातील अन्य गोलंदाज यापूर्वी केलेल्या चुकांपासून बोध घेत असल्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. खेळाडूंना आम्हाला संघातून वगळण्यात येणार नाही, याची कल्पना असल्यामुळे ते आत्ममश्गुल असल्याचे निदर्शनास येते. त्याचप्रमाणे येथील कामगिरीचा त्यांच्या राष्ट्रीय संघातील स्थानावर फरक पडणार नाही, याचीही त्यांना कल्पना आहे.बलाढ्य आणि तीन वेळचा माजी विजेता असलेला मुंबई इंडियन्स संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. सामन्यात कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा त्यांना विश्वास आहे. कर्णधार रोहित शर्माने गेल्या सामन्यामध्ये अपवादात्मक एक चूक केली. त्याने अखेरचे षटक हार्दिक पांड्याला देण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला. या अष्टपैलू खेळाडूमध्ये मधल्या षटकांमध्ये बळी घेण्याची क्षमता आहे, पण लक्ष्याचा बचाव करताना त्याचा वेग व टप्पा चिंतेचा विषय ठरतो. हार्दिक पांड्या स्वभावाने नक्कीच आक्रमक खेळाडू आहे. मात्र अखेरच्या षटकात धावा रोखण्यात तो अपयशी ठरला.यानंतर झालेली दुसरी लढत रंगतदार झाली आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला अखेर विजयाची चव चाखता आली. या शानदार विजयानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाकडून आणखी अशा विजयांची अपेक्षा आहे

टॅग्स :सुनील गावसकरआयपीएल 2019