Video : 'तु जाने ना...' गाणं गुणगुणत वीरेंद्र सेहवाग षटकार खेचतो तेव्हा...

Video: भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा आज 40 वा वाढदिवस... क्रिकेट इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून सेहवाग आजही ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 12:46 IST2018-10-20T12:45:51+5:302018-10-20T12:46:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: Virender Sehwag's singing 'Tu Jane Na' before smashing a six | Video : 'तु जाने ना...' गाणं गुणगुणत वीरेंद्र सेहवाग षटकार खेचतो तेव्हा...

Video : 'तु जाने ना...' गाणं गुणगुणत वीरेंद्र सेहवाग षटकार खेचतो तेव्हा...

मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा आज 40 वा वाढदिवस... क्रिकेट इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून सेहवाग आजही ओळखला जातो. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो सेहवाग प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडायचा. मात्र, चेंडूवर आतषबाजी करण्यापूर्वी सेहवाग गाणं गुणगुणायचा हे तुम्हाला माहित आहे का? त्याच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यावर सेहवागने केलेला खुलासा चाहत्यांना चक्रावून टाकणारा आहे.



महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांनी अमेरिकेत आयोजित केलेल्या ऑल स्टार ट्वेंटी-20 मालिकेतील हा सामना आहे. 'चला जाता हू, किसी के धुन मे' पासून 'मेरे जीवन साथी' आणि अशी अनेक बॉलिवूड गाणी सेहवाग सामन्यात गुणगुणत असे. कधीकधी तर तो भजनही गात असे. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ऑल स्टार मालिकेतील एका सामन्यात सेहवाग चक्क 'कैसे बताये... तु जाने ना...' हे बॉलिवूड चित्रपटातील गाण गुणगुणताना दिसत आहे. 
 
याबाबत सेहवागला एकदा विचारले असता तो म्हणाला,'' चेंडूचा सामना कसा करायचा याचा अधिक विचार करण्यापेक्षा रिलॅक्स राहणे मला आवडते. त्यामुळे मी गाणं गुणगुणतो.'' 


 

Web Title: Video: Virender Sehwag's singing 'Tu Jane Na' before smashing a six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.