Join us  

Video : जबाबदारी ओळखा, कोरोना नियमांचं पालन करा; विराट कोहलीचं भारतीयांना आवाहन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सोशल साईटवर मंगळवारी पोस्ट केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 7:51 PM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सोशल साईटवर मंगळवारी पोस्ट केला. या व्हिडीओत टीम इंडियाचा कर्णधार भारतीय नागरिकांना कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन करत आहे. शिवाय पोलिसांना सहकार्य करा, अशी विनंतीही विराटनं केली आहे.  विराट कोहलीचा पारा चढला?; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे! Video

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील तीन दिवसांत दररोज अडीच लाख रुग्ण सापडत आहेत. आताच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात १ कोटी, ४७ लाख ८८,१०९ कोरोना रुग्ण आहे आणि १ लाख ७७,१५० जणांना प्राण गमवावे लागले. दुसरी लाट अधिक घातक असल्याचे आकडेवारीवरून जाणवत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचं सावट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ३८ लाख ९८, २६२ इतकी झाली आहे आणि ६० हजाराहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहे.

विराट कोहली म्हणाला,''मी विराट कोहली, टीम इंडियाचा कर्णधार सर्व लोकांना आवाहन करतो की लॉकडाऊनशी लढण्यासाठी सर्वांना सहकार्य करा. मास्क घाला, सोशल डिस्टन्स पाळा आणि हात धुवा.. पोलिसांना सहकार्य करा.''  

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :विराट कोहलीकोरोना वायरस बातम्या