Join us  

Video: व्वा शाहरूख व्वा... सामना हरल्यानंतरही किंग खानच्या 'त्या' कृतीने जिंकली फॅन्सची मनं

Shahrukh Khan Jos Buttler Viral video, IPL 2024 KKR vs RR: शाहरूख कोलकाताच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी तर नेहमीच पुढे असतो, पण व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळी गोष्ट दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 9:36 AM

Open in App

Shahrukh Khan Jos Buttler Viral video, IPL 2024 KKR vs RR: च्या मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्स संघाला आपल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने जोश बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर KKRवर २ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात कोलकाताकडून सुनील नारायणनेही १०९ धावांची खेळी केली होती. पण जोश बटलरचे शतक नारायणच्या शतकावर भारी पडले. या सामन्यात कोलकाताच्या संघाला पराभूत व्हावे लागले असले तरीही त्यांच्या मालक शाहरूख खान याच्या एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली.

शाहरुखच्या त्या व्हिडिओने जिंकलं मन

सामना संपल्यानंतर शाहरुख खान मैदानात पोहोचला आणि खेळाडूंची भेट घेतली. यावेळी तो राजस्थान रॉयल्सचा शतकवीर फलंदाज जोस बटलरलाही भेटला. शाहरुखने त्याला मिठी मारली आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही यावर भरपूर कमेंट करत आहेत. 'शाहरुख जोस बटलरचे कौतुक करत आहे. खरंच तो भारतातील सर्वात नम्र सुपरस्टार आहे', असा सूर सोशल मीडियावर दिसत आहे.

सामन्यात प्रथम कोलकाताने फलंदाजी करताना ६ बाद २२३ धावा केल्या. सुनील नारायणने ५६ चेंडूत दमदार १०९ धावा केल्या. त्याने १३ चौकार आणि ६ षटकार लगावले. दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. तरीही राजस्थानच्या पुढे २२४ धावांचे आव्हान ठेवण्यात कोलकाताला यश आले. या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरनेही एकाकी झुंज दिली. रियान पराग (३४) आणि रॉव्हमन पॉवेलने (२६) साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना फारशी गती मिळू शकली नाही. जोश बटलरने मात्र शेवटपर्यंत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला आणि शेवटच्या चेंडूवर राजस्थानला विजय मिळवून दिला.

 

टॅग्स :आयपीएल २०२४जोस बटलरराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सशाहरुख खान