Join us  

Video : आर. अश्विनची रहस्यमयी गोलंदाजी; नव्या शैलीनं सारेच चकित

भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर असला तरी खेळात नवनवीन शोध लावण्याचे कार्य त्यानं सुरू ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:33 PM

Open in App

तामीळनाडू : भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर असला तरी खेळात नवनवीन शोध लावण्याचे कार्य त्यानं सुरू ठेवले आहे. सध्या तो तामीळनाडी प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे आणि येथे त्यानं गोलंदाजीच्या रहस्यमयी शैलीचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे त्यानं विकेट्सही घेतल्यानं त्याची ही शैली सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. डिंडीगूल ड्रॅगन्स संघाचे कर्णधारपद हे अश्विनकडे आहे आणि सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी गतविजेत्या मधुराई पँथर्सवर 30 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या अखेरच्या षटकात त्यानं या रहस्यमयी शैलीनं गोलंदाजी केली. 

  प्रतिस्पर्धी संघाला अखेरच्या षटकात 32 धावांची गरज असताना कर्णधार अश्विननं गोलंदाजी केली. त्यानं पहिल्याच चेंडूवर अभिषेक तन्वरला बाद केले. षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर त्यानं रहस्यमय शैलीत गोलंदाजी केली.  त्याच्या या गोलंदाजीवर फलंदाज किरण आकाश चकीत झाला आणि त्यानं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं टोलवला. पण, त्याला झेलबाद होऊन  माघारी परतावे लागले. मधुराई पँथर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. एन जगदीशन आणि हरी निशांथ यांनी 13.2 षटकांत 104 धावांची सलामी दिली. जगदीशनने नाबाद 87 धावा केल्या आणि त्यात 12 चौकार व 1 षटकार खेचला.  ड्रॅगन्सने 6 बाद 182 धावांचे लक्ष्य उभे केले. पँथर्सला हे आव्हान पेलवलं नाही. ड्रॅगन्सकडून एम सिलंबरसन आणि अश्विन यांनी अनुक्रमे 4/20 व 3/16 अशी कामगिरी केली.

   

टॅग्स :आर अश्विनतामिळनाडू