Join us  

Video: बाबो, अशी गोलंदाजी कराल तर बरगड्याच मोडतील ना राव!

दक्षिण आफ्रिकेचा पॉल अ‍ॅडम आठवतो का? हो तोच गोलंदाजी करताना डोल्यावरून पूर्ण 360 अंशातून हात फिरवून गोलंदाजी करायचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 12:00 PM

Open in App

दक्षिण आफ्रिकेचा पॉल अ‍ॅडम आठवतो का? हो तोच गोलंदाजी करताना डोल्यावरून पूर्ण 360 अंशातून हात फिरवून गोलंदाजी करायचा... आज अचानक त्याची आठवण का झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी अतरंगी गोलंदीजी करणारे फार कमीच खेळाडू आहेत. त्यात पॉलची नकल करणे म्हणजे स्वतःच्या शरीराशीच खेळण्याचा भाग. पण, आज आपण अशा गोलंदाजाला भेटणार आहोत, की पॉलही त्याच्यासमोर पानी कम वाटेल.

केव्हिन कोथथिगोडा असे या गोलंदाजाचे नाव आहे. श्रीलंकेचा हा गोलंदाज सध्या दुबईत सुरू असलेल्या टी 10 लीगमध्ये खेळत आहे. त्याच्या गोलंदाजीची विचित्र शैली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बांगला टायगर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना शनिवारी डेक्कन ग्लॅडिएटर संघाविरुद्ध केव्हिन चर्चेत आला. त्याची गोलंदाजीची शैली ही फलंदाजांना चक्रावून टाकणारी आहे. पण, ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसननं त्याची चांगलीच धुलाई केली. वॉटसननं 25 चेंडूंत 41 धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ...

केव्हिननं दोन षटकांत एकही विकेट न घेता 22 धावा केल्या. बंगाल टायगर्स संघानं 10 षटकांत 108 धावा केल्या. रिली रोसोवू ( 12 चेंडूंत 26 धावा) आणि कॉलिन इग्राम ( 21 चेंडूंत 37) यांनी फटकेबाजी केली. ग्लॅडिएटर्सनं सहा विके्ट्स राखून सामना जिंकला. त्यांच्याकडून वॉटसनने 41 धावा केल्या. त्याला अँटन डेव्हसिच आणि डॅनिएल लॉरेंन्स यांनी अनुक्रमे 27 व 15 धावा करून चांगली साथ दिली.  

टॅग्स :टी-10 लीगश्रीलंकाशेन वॉटसन