Join us  

Video : न्यूझीलंड संघाची खिलाडूवृत्ती; जखमी प्रतिस्पर्धी फलंदाजाला उचलून नेलं मैदानाबाहेर

न्यूझीलंडचा क्रिकेटसंघ हा नेहमी त्यांच्या खिलाडूवृत्तीमुळे ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:28 AM

Open in App

न्यूझीलंडचा क्रिकेटसंघ हा नेहमी त्यांच्या खिलाडूवृत्तीमुळे ओळखला जातो. अंगावर आला की शिंगावर घेईन, जशासतसे अशी त्यांची वृत्ती नाही. जे काही उत्तर द्यायचे ते आपल्या खेळातूनच, हा त्यांचा साधा नियम... त्यामुळेच प्रतिस्पर्धी खेळाडूंप्रती त्यांच्या मनात नेहमी आदर असतो... त्यांच्या याच नम्रपणाचे अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीही कौतुक केले आहे. इंग्लंडमध्ये पार पाडलेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये आणि त्याआधी अनेकदा त्यांच्या या खिलाडूवृत्तीची प्रचिती आली आहे. याची शिकवण त्यांना लहानपणापासूनच दिली जाते आणि यावर शिक्कामोर्तब करणारा प्रसंग आयसीसीच्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत घडला.

भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडला हार मानावी लागली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-0 अशी विजयी आघाडी घेत न्यूझीलंडमध्ये प्रथमच ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला असला तरी त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेत न्यूझीलंडच्या युवा संघानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी वेस्ट इंडिजवर दोन विकेट राखून विजय मिळवला. किवींच्या विजयाबरोबरच या सामन्यात त्यांच्या खेळाडूंनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचेही भरभरून कौतुक होत आहे.

वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या. किर्क मॅकेंझी ( 99), केलव्हन अँडरसन ( 33) आणि अँटोनियो मॉरिस ( 31) हे तिघे वगळता विंडीजच्या फलंदाजांना अपयश आले. किवींच्या क्रिस्टन क्लार्कनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला जोएल फिल्ड आणि जेसे टॅशकोफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली. 239 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना किवी फलंदाजांची भंबेरी उडाली. पण, जोएल फिल्ड ( 38*) आणि क्रिस्टन क्लार्क ( 46*) यांनी 9व्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करताना किवींचा विजय निश्चित केला. किवींनी अखेरच्या षटकात हा विजय मिळवला. 

तत्पूर्वी, विंडीजचा किर्क मॅकेंझी हा विंडीजकडून बाद होणारा अखेरचा फलंदाज होता. त्यानं 104 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकार खेचून 99 धावा केल्या. डावाच्या 48व्या षटकात मॅकेंझी 99 धावांवर क्लार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दुखापतग्रस्त असूनही क्लार्कने संघासाठी संघर्ष केला. बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याला चालताही येत नव्हतं अन् त्यावेळी किवींच्या जेसे टॅशकोफ व जोएल फिल्ड या दोघांनी त्याला उचलले आणि मैदानाबाहेर नेले. किवी खेळाडूंच्या या कृतीचे जगभरातून कौतुक होत आहे..

पाहा व्हिडीओ...

IND Vs NZ, 3rd T20I : टीम इंडियाच्या 'Super' विजयावर बिग बी अन् वीरूचं खास ट्विट

IND vs NZ : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा तगडा संघ जाहीर

IND Vs NZ, 3rd T20I : विराट कोहलीनं 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, ठरला टीम इंडियाचा अव्वल कर्णधार

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मा दस हजारी मनसबदार; हा शिखर सर करणारा चौथा भारतीय

IND Vs NZ: सुपर ओव्हरवर बंदी आणा, न्यूझीलंडच्या क्रीडा मंत्र्यांनी केली अजब मागणी

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपन्यूझीलंडवेस्ट इंडिज