Join us  

Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर वारंवार सूचना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 1:51 PM

Open in App

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर वारंवार सूचना करत आहे. त्याचबरोबर या व्हायसचे गांभीर्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे अख्तरने कानही टोचले आहेत. अख्तरने त्याच्या यू ट्यूब चॅनेलवर नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यानं लोकांना चुकीची जीवनशैली सोडण्याचं आवाहन केले आहे. त्यानं योग्य जेवण घेण्याचा सल्ला दिला आहे. योग्य आहारानं शरिरातील प्रतिकारशक्ती वाढते, असंही त्यानं सांगितलं आहे. अख्तरचे हे सल्ले ऐकून लोकांना योगगुरू बाबा रामदेव यांची आठवण येत आहे.

लोकांना सल्ला देण्यापूर्वी अख्तर स्वतः धाव घेताना दिसत आहे. यातून त्यानं लोकांना धावण्याचे फायदे समजावून सांगितले. धावल्यानं फुफ्फुसं मजबूत होतात आणि शरिरातील रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. या वेळी त्यानं बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या आहारातही कसा बदल होत गेला यावरही भाष्य केलं आहे. या बदललेल्या आहारामुळे पचनक्षमता खराब झाल्याचेही त्यानं सांगितले.

''लोकांना गाजर, मुळा आणि भाज्या खाणं आवडत नाही. आता सर्वजण रेस्टॉरंटमध्ये जाऊन कच्चा पिझ्झा खातात, शीतपेय पितात. यामुळे आपली पचनक्षमता बिघडते. त्यामुळे कोणताही व्हायरस येतो आणि लोकं लगेच आजारी पडतात. पचनक्षमता मजबूत बनवायची असल्यास घरचं जेवण जेवा,'' असा सल्ला त्यानं दिला. तो पुढे म्हणाला,''ऊसाचा रस, लिंबू पाणी पिण्यास लोकं नाक मुरडतात. त्यांना शीतपेय हवं असतं.'' 

पाहा व्हिडीओ...

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत 

Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!

श्रीलंका, बांगलादेश अन् आता पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही दिला मदतीचा हात; BCCI पुढाकार कधी घेणार?

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशोएब अख्तर