Join us  

Video : स्वत:ला कोरोनाची बाधा झाल्यानंतरही आफ्रिदीला गांभीर्यच नाही; सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा नुकताच कोरोनावर मात करून बरा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 2:51 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा नुकताच कोरोनावर मात करून बरा झाला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर त्यानं पाकिस्तानातील जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं होतं. कोरोना संकटात शाहिद आफ्रिदी फाऊंडेशननं अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्याचं काम केलं. पण, त्यानं शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे त्याच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत आफ्रिदी सोशल डिस्टन्सिंगची एैशीतैशी उडवत विनामास्क लोकांसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यानं जमलेल्या अन्य व्यक्तींची भेट घेतली आणि त्याच्या भवती जमलेला गोतावळा पाहून पाकिस्तानात कोरोना आहे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.

13 जूनला झालेला कोरोना13 जूनला आपल्याला कोरोना झाल्याचे आफ्रिदीनं ट्विट केलं होतं. त्यात त्यानं लिहिलं होतं की,''गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली होती. माझे शरीर प्रचंड दुखत होते. त्यानंतर मी वैद्यकिय चाचणी केली आणि त्यात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.'' त्यानंतर तो घरीच क्वारंटाईन झाला आणि उपचार घेऊन बरा झाला.

पाकिस्तानी खेळाडूंना दिलेला सल्लाइंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या बातमीनंतर आफ्रिदीनं ट्विट केलं होतं की,''फाखर, इम्रान खान, कशीफ, हाफिज, हसनैन, रिझवान, वाहब आणि मलंग यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी, यासाठी प्रार्थना करतो. सर्वांना काळजी घ्या. या व्हायरला गांभीर्यानं घ्या, असं आवाहन मी पाकिस्तानी जनतेला करतो.''  

दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या ठिकाणी आफ्रिदीचा डान्सवजिरिस्तान येथे दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला होता. येथेच जाऊन आफ्रिदीनं शनिवारी डान्स केला. हा व्हिडीओ तिथलाच आहे. 

पाहा व्हिडीओ...    

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानकोरोना वायरस बातम्या