Join us  

Video : सचिन तेंडुलकरची पाणी साचलेल्या खेळपट्टीवर तुफान फटकेबाजी

भारताचा माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव का म्हणतात, याची प्रचिती अनेकदा आलेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 1:08 PM

Open in App

भारताचा माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव का म्हणतात, याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. 20 वर्षांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दरारा निर्माण करणाऱ्या तेंडुलकरने 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेंडुलकर कसा घडला आणि त्यानं यशस्वी क्रिकेटपटू बनण्यासाठी किती मेहनत घेतली, याची जाण सर्वांना आहे.  

तेंडुलकरने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओ तेंडुलकर पाणी साचलेल्या खेळपट्टीवर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्यानं लिहिले की,''खेळाप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम पाहता आपण सरावासाठी नवीन शक्कल शोधून काढतोय. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा मनमुराद आनंद लुटता.'' इंस्टाग्राम व ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत पाणी साचलेल्या खेळपट्टीवर तेंडुलकर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.  

पाहा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतक करणारा तेंडुलकर हा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. त्याने वन डे क्रिकेटमध्ये 49 आणि कसोटीत 51 शतकं झळकावली आहेत. 200 कसोटींत त्यानं 15921 धावा केल्या आहेत, तर 463 वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18426 धावा आहेत.

टॅग्स :सचिन तेंडुलकरबीसीसीआय