Join us

Video: मुंबईच्या रस्त्यावर सचिन तेंडुलकर भरकटला; मराठी रिक्षाचालक मदतीला धावला, पाहा व्हिडीओ

Sachin Tendulkar News: एखाद्या रस्त्यावर आपण भरकटलो तर आजूबाजूला असणारा व्यक्तीच आपल्या मदतीला धावून येतो, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबतही असचं काहीसं मुंबईत घडलं,

By प्रविण मरगळे | Updated: November 25, 2020 20:08 IST

Open in App

मुंबई – वाढती लोकसंख्या शहरात सुरु असलेल्या कामांमुळे अनेकदा मुंबईत रस्ते चुकतानाच अनुभव तुम्हालाही कधीतरी आला असेल, सध्याच्या जगात तंत्रज्ञानाचा वापर अनेकांच्या जीवनात महत्त्वाचा ठरतो, सामान खरेदी करण्यापासून जगाशी जोडले जाण्यापर्यंत सर्वच गोष्टी इंटरनेटच्या माध्यमात मिळतात, तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे, एखाद्या ठिकाणी आपण रस्ता चुकलो तर नेव्हिगेशनचा वापर केला जातो, परंतु या माध्यमातून रस्ते दाखवण्याचं तंत्रज्ञान अनेकदा चुकूही शकतं.

एखाद्या रस्त्यावर आपण भरकटलो तर आजूबाजूला असणारा व्यक्तीच आपल्या मदतीला धावून येतो, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबतही असचं काहीसं मुंबईत घडलं, या घटनेचा व्हिडीओ सचिनने त्यांच्या फेसबुक वॉलवरून शेअर केलाय, ज्यात सचिन रस्ता विसरला असता एक मराठी रिक्षाचालक त्याच्या मदतीला धावला.

सचिनने जानेवारी २०२० मधील हा व्हिडीओ आज शेअर केला आहे, यात सचिनने कशाप्रकारे रस्ता चुकला ते सांगितलं आहे, सचिन म्हणतो की, मी कांदिवली पूर्वमध्ये आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु मी याठिकाणी रस्ता विसरलो आहे, रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात कामं सुरु असल्याने मला कोणत्या रस्त्याने जायचं ते ओळखता येत नाही, तेव्हा एका रिक्षाचालकाने त्याला मदत केली,

सचिनने या रिक्षाचालकाची आपुलकीने चौकशी केली, या रिक्षाचालकाचं नाव मंगेश फडतरे असं होतं, तो कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत होता, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, माझी मुलगी तुमची फॅन आहे असं रिक्षा चालकानं सचिनला सांगितलं, माझ्या रिक्षाला फॉलो करा असं रिक्षाचालक म्हणाला, त्यानंतर सचिनची अलिशान गाडी रिक्षाच्या मागून त्याला फॉलो करत हायवेपर्यंत येऊन पोहचली, याठिकाणी सचिनने रस्त्याच्या बाजूला गाडी लावत रिक्षाचालकाला सेल्फीदेखील दिला. हायवेवर पोहचल्यानंतर सचिनने त्याचा मार्ग सापडला आणि तो वांद्रेच्या दिशेने रवाना झाला.

सचिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे, आतापर्यंत ६४ हजारांहून अधिक लोकांना हा व्हिडीओ लाईक्स केलाय तर अडीच हजाराहून अधिक जणांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.   

पाहा व्हिडीओ

टॅग्स :सचिन तेंडुलकरमुंबईऑटो रिक्षा