Join us  

VIDEO : रोहितच्या मागे उभं राहून अश्विनने केलं असं कृत्य, चाहते म्हणाले- 'भावाने हॉस्टेलची आठवण करून दिली'

भारतीय क्रिकेट संघातील फलंदांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडिओ मैदानातील गमतीचे असतात. असाच एक व्हिडिओ भारतीय गोलंदाज अश्विनचा व्हायरल झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 11:42 AM

Open in App

भारतीय क्रिकेट संघातील फलंदांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडिओ मैदानातील गमतीचे असतात. असाच एक व्हिडिओ भारतीय गोलंदाज अश्विनचा व्हायरल झालाय. या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. इंडिया विरुद्ध झिंम्बाब्वे सामन्याच्या टॉसदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. 

झिंम्बाब्वे सामन्याच्या टॉसदरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि झिंम्बाब्वे टीमचा कर्णधार टॉस घेत होते. यावेळी अश्विन मागे उभा राहिला होता. पण यावेळी अश्विनने अशी क्रिया केली की चाहत्यांनी त्याला चांगल्याच कमेंट केल्या आहेत. 

टॉस झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा इयान बिशपशी बोलत होता. आणि त्याच्या मागे अश्विनही फ्रेममध्ये दिसत आहे. यावेळी अश्विन गोलंदाजी किंवा फलंदाजी करत नव्हता. अश्विन त्याच्या जॅकेटचा वास घेत होता. तो नाकाने चेक करत होता की कोणाचे जॅकेट फ्रेश आहे. यावेळी अश्विनने नाकाला दोन जॅकेट लावल्याचे दिसतंय. यानंतर एक जॅकेट परत आपल्याकडे घेतले आणि तिथून निघून गेला. अश्विनच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अश्विनला पाहून त्यांच्या हॉस्टेलच्या दिवसांची आठवण झाली, अशी कमेंट चाहत्याने केली आहे. 

भारतीय खेळाडू अभिनव मुकुंद यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. "हा व्हिडिओ आधीच अनेक वेळा पाहिला आहे. @ashwinravi99 कृपया योग्य स्वेटर निवडण्याच्या तुमच्या तर्काने आम्हाला प्रबोधन करा, असं ट्विट मध्ये म्हटले आहे. या ट्विटला अश्विनने रिप्लाय दिला आहे. " जॅकेट माझेच आहे का हे पाहण्यासाठी साईज तपासली, यानंतर मी वापरत असलेला परफ्युमही तपासला, असं रिप्लायमध्ये अश्विनने म्हटले आहे. 

झिम्बाब्वे सामन्यात अश्विनने चांगली खेळी केली.अश्विनने  तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. टीम इंडियाने या सामन्यात १८५ धावा केल्या, मात्र अश्विनची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर सूर्या-राहुलच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने ७१ धावांनी सामना जिंकला. अश्विनने या सामन्यात २२ धावांत ३ बळी घेतले.

टॅग्स :आर अश्विनरोहित शर्मासोशल व्हायरलऑफ द फिल्ड
Open in App