Join us  

Video : 'Chahal TV'वर येण्यास महेंद्रसिंग धोनीनं दिला नकार, कारण...  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचवा वन डे  सामन्यात विजय मिळवला आणि मालिका 4-1 अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 9:49 AM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका 4-1ने खिशात घातलीपाचव्या वन डे सामन्यात भारताचा 35 धावांनी विजय

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचवा वन डे  सामन्यात विजय मिळवला आणि मालिका 4-1 अशी खिशात घातली. भारतीय संघात सुरू झालेल्या नव्या परंपरेनुसार विजयाचा शिल्पकार असलेल्या खेळाडूला 'Chahal TV' वर बोलावले जाते. फिरकीपटू युजवेंद्र चहलची ही नवी भूमिका सर्वांच्या पसंतीत उतरत आहे आणि 'Chahal TV'वर येण्यासाठी प्रत्येक खेळाडू आतूरही असतो, परंतु कॅप्ट कूल महेंद्रसिंग धोनीनं 'Chahal TV'वर येण्यास रविवारी चक्क नकार दिला.

भारतीय संघातील दोन प्रमुख चेहरे कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 'Chahal TV'वर मुलाखत दिल्यानंतर हा कार्यक्रम भलताच हिट झाला. गत महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या वन डे मालिकेत 'Chahal TV'ची सुरुवात करण्यात आली. या टिव्हीवर क्रिकेटपटू सामन्यानंतर गप्पा मारतात आणि संघाच्या एकूण कामगिरीवर चाहत्यांना माहिती देतात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या 'Chahal TV'चा मोह मात्र धोनीनं टाळला. 'Chahal TV'वर येण्यासाठी चहलला माजी कर्णधाराच्या मागे अक्षरशः धावावं लागले, परंतु धोनी त्याच्या हाती आला नाही.  पाहा व्हिडीओ...

धोनीनं नकार दिल्यानं प्रभारी कर्णधार रोहित शर्मा 'Chahal TV'वर आला. रोहित दुसऱ्यांदा 'Chahal TV'वर आला. दरम्यान,  अंबाती रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध न्यूझीलंडयुजवेंद्र चहलरोहित शर्मा