Join us  

Video : लोकेश राहुलनेच घेतली मयांक अग्रवालची विकेट; नेटिझन्समध्ये संताप

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या जोडीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला मजबूत स्थितित आणले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 2:32 PM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या जोडीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला मजबूत स्थितित आणले आहे. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना चौथ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करताना संघाला तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 185 धावांचा पल्ला गाठून दिला. तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची आघाडी 260 पर्यंत पोहोचली आहे. पण, या सामन्यात लोकेश राहुलने टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालची विकेट घेतली. त्यामुळे विडींजला पहिले यश मिळवले. राहुलच्या या सल्ल्यावर नेटिझन्स चांगलेच भडकले. 

भारतीय गोलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी करताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव 222 धावांत गुंडाळत 75 धावांची आघाडी घेतली. इशांत शर्माने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. यानंतर दुसऱ्या डावात भारताच्या सलामीच्या जोडीला साजेशी कामगिरी करता आली नाही. 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोस्टन चेसने टीम इंडियाचा सलामीवीर मयांकला पायचीत केले. पंचांनीही त्याला बाद ठरवले. त्यानंतर मयांकने DRS घेऊ की नको, असा सल्ला राहुलला विचारला. त्यानं नको असे सांगताच मयांकने तंबूची वाट धरली. पण, रिप्लेमध्ये मयांक बाद होत नसल्याचे स्पष्ट दिसत होते. जर राहुलने तो सल्ला दिला नसता तर मयांकची विकेट गेली नसली. मयांकच्या विकेटनंतर राहुलला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागला.  

पाहा व्हिडीओ... त्यानंतर चाहत्यांनी चांगलाच समाचार घेतला. चहापानापर्यंत भारताने 37 षटकांत 3 बाद 98 धावा केल्या होत्या.  वेस्ट इंडिजला उपहारानंतर बळी मिळवण्यासाठी फार वेळ वाट बघावी लागली नाही. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेस याने मयांक अग्रवालला पायचीत केले. त्यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे संयमी खेळी करत होते. दोघांनी दुसºया गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. राहुल चुकीचा फटका मारून बाद झाला. त्याला देखील रोस्टन चेस याने बाद केले. त्याने 85 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. पुजारादेखील चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही. केमार रोचच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 53 चेंडूत 25धावा केल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजलोकेश राहुलमयांक अग्रवाल