Join us  

Video : विचित्र पद्धतीनं बाद झाला श्रीलंकेचा फलंदाज; वेस्ट इंडिजचा संघ अन् कारयन पोलार्ड आरोपीच्या पिंजऱ्यात

Danushka Gunathilaka Obstructing the field वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात बुधवारी पहिला वन डे सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका ( Danushka Gunathilaka ) याला विचित्र पद्धतीनं बाद ठरवण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:32 AM

Open in App

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात बुधवारी पहिला वन डे सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका ( Danushka Gunathilaka ) याला विचित्र पद्धतीनं बाद ठरवण्यात आले. Obstructing the field क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे त्याला बाद ठरवण्याल आहे आणि त्यानंतर सुरू झाला वाद. वेस्ट इंडिजनं पहिला वन डे सामना ८ विकेट्स राखून जिंकला, परंतु श्रीलंकेच्या डावातील २२व्या षटकात धनुष्का बाद झाला. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड ( Kieron Pollard)  हा तेव्हा गोलंदाजी करत होता. धनुष्कानं ६१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५५ धावा केल्या. त्यानं  दिमुथ करुणारत्नेसह पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली.  IPL 2021ला सुरूवात होण्यापूर्वीच स्फोटक फलंदाजानं सोडली RCBची साथ, विराट कोहलीच्या संघानं घेतली न्यूझीलंडची मदत 

पोलार्डच्या षटकातील पहिल्या चेंडूवर धनुष्कानं फटका मारला आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला पामुळे निसंका धाव घेण्यासाठी धावला. धुनष्काही क्रीजच्या बाहेर आला, परंतु धाव पूर्ण होणार नाही, असे समजताच तो माघारी परतला. माघारी जात असताना चेंडूला त्याचा पाय लागला आणि चेंडू मागे गेला. पोलार्ड तो चेंडू घेण्यासाठी पुढे आला होता, परंतु धनुष्कामुळे त्याला चेंडू उचलता आला नाही. त्यानंतर पोलार्डन अपील केले. मैदानावरील पंच जोएल विलसन यांनी तिसऱ्या पंचाकडे निर्णय मागितला आणि त्यात धुनष्काला बाद देण्यात आले. रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं! 

पाहा नेमकं काय घडलं...  वन डे क्रिकेटमध्ये obstructing the field बाद झालेले खेळाडूरमीज राजा वि. इंग्लंड, १९८७मोहिंदर अमरनाथ वि. श्रीलंका, १९८९इंझमाम उल हक वि. भारत, २००६मोहम्मद हाफिज वि. दक्षिण आफ्रिका, २०१३अन्वर अली वि. दक्षिण आफ्रिका, २०१३बेन स्टोक्स वि. ऑस्ट्रेलिया, २०१५झेव्हीयर मार्शल वि. यूएई, २०१९

शे होपची शतकी खेळी अन् विंडीजचा विजयधनुष्का गुणतिलका ( ५५), दिमुथ करुणारत्ने ( ५२) आणि अॅशेन बंदारा ( ५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २३२ धावा केल्या. जेसन मोहम्मद व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या शे होपनं १३३ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह ११० धावा चोपल्या. एव्हिन लूईसनं ९० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ६५ धावांचे योगदान दिले. 

टॅग्स :वेस्ट इंडिजश्रीलंकाकिरॉन पोलार्ड