Join us

सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय

अखेर भारताच्या मोठ्या आघाडीमुळे श्रीलंका संघाला साहसी बनविले. भारताने या मलिकेत सलग दुसºयांदा पहिल्या डावात ६०० चा आकडा गाठला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांत गुंडाळला. दरम्यान, दुसºया डावात एक-दोन चांगल्या भागीदारी झाल्यामुळे श्रीलंका संघ सामन्याचा निकाल लांबविण्यात यशस्वी ठरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:52 IST

Open in App

-सुनील गावसकरअखेर भारताच्या मोठ्या आघाडीमुळे श्रीलंका संघाला साहसी बनविले. भारताने या मलिकेत सलग दुसºयांदा पहिल्या डावात ६०० चा आकडा गाठला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांत गुंडाळला. दरम्यान, दुसºया डावात एक-दोन चांगल्या भागीदारी झाल्यामुळे श्रीलंका संघ सामन्याचा निकाल लांबविण्यात यशस्वी ठरला.श्रीलंकेचे दोन युवा खेळाडू दिमुथ करुणारत्ने व कुसाल मेंडिस यांनी शानदार फलंदाजी केली. करुणारत्ने डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने परिस्थिती ओळखून फलंदाजी केली आणि धावा फटकावण्यासाठी मागेपुढे न बघता वेगळा पवित्रा स्वीकारला. गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक १७६ धावांची खेळी केल्यानंतर मेंडिसबाबत बरीच चर्चा होत होती. भारताविरुद्धची त्याची शतकी खेळीही शानदार होती. त्यात कसोटी क्रिकेटमधील काही चांगल्या स्वीप फटक्यांचा समावेश होता. अनेक वर्षांपासून भारतीय फिरकीपटू दर्जेदार स्वीपचा फटका खेळणाºया फलंदाजांविरुद्ध अपयशी ठरले आहेत आणि मेंडिसने तेच केले. खेळपट्टीवर चेंडू अनियमितपणे उसळत असताना त्याने शानदार स्वीपचे फटके खेळले. मेंडिसच्या स्वीपची विशेषता म्हणजे तो चेंडूचा टप्पा लवकर ओळखत होता. तो चेंडूच्या टप्प्याचा अचूक अंदाज घेत जमिनीलगत स्वीपचा फटका खेळत होता. संथ होणाºया खेळपट्टीमुळे काही ड्राईव्ह व कट््सचे फटकेही लगावले. संथ खेळपट्टीमुळे अचूक टप्प्याच्या चेंडूवरही त्याला अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता.करुणारत्ने धाडसी फलंदाज नाही, पण मेंडिसप्रमाणे त्यानेही स्वीप खेळण्यास सुरुवात केली. त्याचा त्याला चांगला लाभही झाला. त्यामुळे गोलंदाजांना चेंडूचा टप्पा थोडा आखूड ठेवावा लागला आणि करुणारत्नेला कट व पुलचे फटके लगावता आले. मेंडिस बाद झाल्यानंतर करुणारत्ने व मॅथ्यूज यांच्यादरम्यान भागीदारी झाली, पण ती भारतीय संघाला चिंता करण्यास भाग पाडणारी नव्हती.अखेर जडेजाचे चेंडू चांगलेच वळायला लागले. त्याने करुणारत्नेविरुद्ध राऊंड द विकेट मारा करणे सुरू ठेवले आणि एका अधिक उसळलेल्या चेंडूवर त्याला तंबूचा मार्ग दाखविला.जडेजाने जर डावखुºया फलंदाजांसाठी भारतीय गोलंदाजांच्या राऊंड द विकेट मारा करण्याच्या रणनीतीचा सुरुवातीपासून अवलंब केला असता तर ही लढत फार पूर्वीच जिंंकता आली असती. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये विविधता असणे महत्त्वाचे असते. याचा अवलंब करण्यासाठी भारताने उशीर केला. शेवटी भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारला. हा संघ कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवण्यास सक्षम भासतो. (पीएमजी)