चेन्नई - बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आज दिलीप वेंगसरकर यांचे दावे खोडून काढले आहेत. वेंगसरकर यांनी दावा केला होता की, वेंगसरकर यांना पदावरून हटवण्यासाठी श्रीनिवासन जबाबदार होते. हे आरोप पूर्णपणे चुकीचे तसेच निराधार असल्याचे श्रीनिवासन म्हणाले.
वेंगसरकर यांनी दावा केला होता की, २००८ मध्ये तामिळनाडूचा फलंदाज एस बद्रीनाथ याच्या ऐवजी विराट कोहलीची निवड केल्यामुळे त्यांना निवड समितीचे अध्यक्षपद गमवावे लागले होते. त्यासाठी श्रीनिवासनच जबाबदार होते.’ श्रीनिवासन यांनी सांगितले की, ‘ते कुणाकडून बोलत आहेत. तसेच त्यांच्या वक्तव्यामागे कोणता हेतू आहे माहीत नाही. पण हे खरे नाही.’
एका क्रिकेटरने असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यांच्या वक्तव्यात खरेपणा नाही. मी संघ निवडीच्या बाबतीत हस्तक्षेप करत नव्हतो. ते कोणत्या हस्तक्षेपाबाबत बोलत आहेत.’
श्रीनिवासन यांनी सांगितले की,‘ वेंगरसरकर यांनी २००८ मध्ये निवड समितीचे अध्यक्षपद यासाठी गमावले होते की तेव्हा त्यांना मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्षपदी कायम राहायचे होते.’