Join us

‘वीरू’ म्हणतोय... ये दोस्ती हम नही तोडेंगे!

विनोद कांबळीच्या मनात सचिनच्या आठवणी आजही कायम आहेत. म्हणून की काय, त्याने आज ट्विट करीत सचिनला तू ‘जय’ आणि मी ‘वीरू’ असल्याचे संबोधले. 

By sagar sirsat | Updated: August 5, 2018 19:22 IST

Open in App
ठळक मुद्देविनोद-सचिन हे बालपणीचे मित्र. आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखालीच ते शिकले. मोठे झाले. शालेय क्रिकेटमध्ये ६६४ धावांची विक्रमी भागीदारी या दोघांच्या नावावर आहे.

सचिन कोरडे  : रविवारी ‘फ्रेण्डशिप डे’ सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने जुने मित्र एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. कधीकाळी घट्ट मैत्रीचे नाते असलेली विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची जोडी अशीच ‘फ्रेण्डशिप डे’ साजरा करायची. मात्र, आज हे मित्र थोडे दुरावलेत. परंतु, विनोद कांबळीच्या मनात सचिनच्या आठवणी आजही कायम आहेत. म्हणून की काय, त्याने आज ट्विट करीत सचिनला तू ‘जय’ आणि मी ‘वीरू’ असल्याचे संबोधले. 

बॉलीवूडमधीलप्रसिद्ध ‘शोले’ या चित्रपटातील जय-वीरूची जोडी जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. विनोदला आज ही जोडी आठवली. या जोडीची तुलना त्याने आपल्या जोडीशी केली. तो म्हणतोय, की मैदानावर तू महान खेळाडू आहेसच आणि मैदानाबाहेर तू माझ्यासाठी ‘जय’ आहेस. या दिवशी मी इतकेच म्हणेन की ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे...’

विनोद-सचिन हे बालपणीचे मित्र. आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखालीच ते शिकले. मोठे झाले. शालेय क्रिकेटमध्ये ६६४ धावांची विक्रमी भागीदारी या दोघांच्या नावावर आहे. आजही तिचे स्मरण केले जाते. या भागीदारीनंतर या जोडीला ‘जय-वीरू’ची जोडी म्हणून ओळखले जाऊ लागले. उल्लेखनीय म्हणजे, सचिन आणि विनोद या दोघांच्याही शोले चित्रपट आवडीचा आहे. विनोदच्या आजच्या टष्ट्वीटने मात्र क्रिकेट चाहत्यांना या जोडीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

टॅग्स :सचिन तेंडूलकरविनोद कांबळीफ्रेण्डशीप डे