Join us

अकोला संघाचा एका गड्याने निसटता विजय, प्रभात चौखंडे ठरला सामनावीर

व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा

By atul.jaiswal | Updated: May 6, 2024 15:27 IST

Open in App

अकोला : जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत सोमवार, ५ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये अकोला संघाने भंडारा संघाला, तर वाशिम संघाने यवतमाळ संघाला पराभूत केले.

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भंडारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना अकोला संघाने १९.२ षटकांमध्ये ९ गडी गमावून केवळ १६२ धावा करून अवघ्या एका गड्याने निसटता विजय मिळविला. 

या सामन्यात सात चौकार व एक षटकारासह केवळ ४० चेंडूत ६२ धावा करणारा अकोल्याचा फलंदाज प्रभात चौखंडे हा सामनावीर ठरला. पंच म्हणून आशिष सोळंके व संजय बुंदेले, तर स्कोअरर म्हणून नीलेश लखाडे यांनी काम पाहिले. 

टॅग्स :अकोला