IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?

Vaibhav Suryavanshi viral photo, IPL 2025: वैभवने राजस्थान संघाकडून खेळताना धडाकेबाज फलंदाजी केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:37 IST2025-05-19T12:34:23+5:302025-05-19T12:37:11+5:30

whatsapp join usJoin us
vaibhav suryavanshi with beard moustache photo viral fact check ipl 2025 rajasthan royals | IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?

IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vaibhav Suryavanshi viral photo, IPL 2025: भारतात सध्या टी२० लीग सुरू आहे. या स्पर्धेत १४ वर्षाच्या खेळाडूपासून ते ४३ वर्षाच्या खेळाडूपर्यंत सर्व वयोगटातील खेळाडू खेळत आहेतच. या IPL मध्ये सध्या एका फोटोने साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे. वैभव सूर्यवंशीचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये या १४ वर्षांच्या मुलाला चक्क दाढी आणि मिशी फुटल्याचे दिसते आहे. १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशीला खरोखरच दाढी आहे का? नेमके या फोटोमागचे सत्य काय आहे? वैभव सूर्यवंशीचे नेमके वय किती? असे विविध प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाल्याचे दिसत आहेत.

वैभव सूर्यवंशीला खरंच दाढी-मिशी फुटली?

राजस्थानचा रॉयल्सचा धडाकेबाज सलामीवीर वैभव सूर्यवंशी हा सध्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ३५ चेंडूत धमाकेदार शतक ठोकले. त्याने आपल्या फलंदाजीने साऱ्यांनाच अवाक् केले. पण तो केवळ १४ वर्षांचा असूनही त्याने खेळलेले फटके एखाद्या बड्या खेळाडूलाही लाजवतील असेच आहेत. पण दाढीमिशी असलेला व्हायरल फोटोमध्ये वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये दिसत आहे. त्याला दाढी आणि मिशा आहेत. इतकेच नव्हे तर एखाद्या वयात आलेल्या मुलाप्रमाणे त्याची दाढी-मिशी बऱ्यापैकी दाट आहे. त्यामुळे त्याच्या वयावर पुन्हा पुन्हा प्रश्न केले जात आहेत.

व्हायरल फोटोमागचे सत्य काय?

वैभवचा फोटो ज्या X अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, त्याकडे जर नीट पाहिलेत तर एक गोष्ट कळेल की, ते एक पॅरडी अकाउंट म्हणजे विडंबनात्मक गोष्टींचे मजेशीर अकाउंट आहे. त्यावरही असे स्पष्टपणे लिहिलेदेखील आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की व्हायरल होत असलेला फोटो वैभव सूर्यवंशीचा खरा फोटो नाही. तो एक बनावट किंवा AI ने तयार करून घेतलेला फोटो आहे, जो सध्या व्हायरल करण्यात आला आहे.

वैभव सूर्यवंशीची IPL मधील कामगिरी

वैभवने राजस्थानकडून सलामीला उतरून ६ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. वैभवने २१९ च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याच्या २०० पेक्षाही कमी धावांमध्ये १४ चौकार आणि तब्बल २० षटकारांचा समावेश करण्यात आला आहे. यात एका शतकाचाही समावेश आहे.

Web Title: vaibhav suryavanshi with beard moustache photo viral fact check ipl 2025 rajasthan royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.