सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड

इंग्लंडच्या मैदानात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:01 IST2025-07-05T20:00:18+5:302025-07-05T20:01:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vaibhav Suryavanshi Smashes Fastest Century In History Of Youth ODIs Break Pakistani Cricketer Record | सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड

सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड

Vaibhav Suryavanshi Fastest Century In History Of U19 ODI : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या वनडेत अंडर १९ क्रिकेटमधील सर्वात जलद शतकी खेळी करत नवा इतिहास रचला आहे. शनिवारी वॉर्सेस्टरच्या मैदानात इंग्लंड अंडर-१९ संघाविरुद्ध भारत अंडर-१९ संघाच्या डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यंवशीनं १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला सुरुंग लावला. त्याने पाकिस्तानच्या फलंदाजाचा विक्रम मोडीत काढलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वैभव सूर्यंवशीनं रचला इतिहास, पाकच्या गड्याला टाकले मागे

भारतीय अंडर १९ संघाकडून खेळताना वैभव सूर्यंवशी याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या वनडेत ५२ चेंडूत शतक झळकावले. याआधी अंडर १९ मधील सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड हा पाकिस्तानच्या कामराम गुलामच्या नावे होता. त्याने ५३ चेंडूत शतक ठोकले होते. वैभव सूर्यंवशीनं आपल्या वादळी खेळीत १० चौकार आणि ७ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. या खेळीसह अंडर १९ मधील सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम आता भारतीय युवा बॅटरच्या नावे झाला आहे.

'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'

U 19 वनडे जलद शतकी खेळी करणारे फलंदाज

  • ५२ चेंडू - वैभव सूर्यवंशी - भारत U19 विरुद्ध इंग्लंड U19 - वॉर्सेस्टर (२०२५)
  • ५३ चेंडू - कामरान गुलाम - पाकिस्तान अंडर 19 विरुद्ध इंग्लंड अंडर 19 - लीसेस्टर (२०१३)
  • ६८ चेंडू - तमीम इक्बाल - बांग्लादेश अंडर 19 विरुद्ध इंग्लंड अंडर 19 - फतुल्लाह (२००५/०६)
  • ६९ चेंडू - राज अंगद बावा - भारत U19 विरुद्ध युगांडा U19 - तारौबा (२०२१/२२)
  • ६९ चेंडू - शॉन मार्श - ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्ध केनिया अंडर 19 - डुनेडिन (२००१/०२)

याआधी वैभव सूर्यंवशी याने कसोटीत सोडली होती खास छाप
 
मागील वर्षी १४ वर्षीय वैभव सूर्यंवशी याने चेन्नईच्या मैदानात ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्ध मेन्स यूथ टेस्टमध्ये दुसरे सर्वात जलद शतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. कसोटीत त्याच्या नावे ५६ चेंडूत शतक झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. अंडर १९ कसोटीत सर्वात जलद शतक झळकवण्याचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या मोईन अलीच्या नावे आहे. त्याने २००५ मध्ये ५६ चेंडूत शतक झळकावले होते.

१९ वर्षांखालील भारतीय संघाने उभारला धावांचा डोंगर


वैभव सूर्यंवशीनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात ७८ चेंडूत १३ चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने १४३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय विहान मल्होत्रानं १२१ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १२९ धावा ठोकल्या. या दोन शतकांच्या जोरावर भारतीय अंडर १९ संघानं निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात ३६३ धावा केल्या आहेत.

Web Title: Vaibhav Suryavanshi Smashes Fastest Century In History Of Youth ODIs Break Pakistani Cricketer Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.