Suresh Raina : सुरेश रैनाला Urgent हवंय ऑक्सिजन सिलेंडर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली मदत

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत श्रीमंत, गरीब, हाय प्रोफाईल, लो प्रोफाईल सर्वच ओढली गेली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:01 PM2021-05-06T16:01:46+5:302021-05-06T16:02:02+5:30

whatsapp join usJoin us
'Urgent Requirement of an Oxygen Cylinder' - Suresh Raina Reaches Out to UP CM Yogi Adityanath For Help | Suresh Raina : सुरेश रैनाला Urgent हवंय ऑक्सिजन सिलेंडर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली मदत

Suresh Raina : सुरेश रैनाला Urgent हवंय ऑक्सिजन सिलेंडर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत श्रीमंत, गरीब, हाय प्रोफाईल, लो प्रोफाईल सर्वच ओढली गेली आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानं आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करावी लागली. त्यानंतर फ्रँचायझीतील सर्व सदस्य आपापल्या कुटुंबीयाकडे परतले आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) यालाही ऑक्सिजनची गरज पडली आहे आणि त्यानं थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे.

देशात मागील 24 तासांत 4 लाख 12, 262 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे आणि 3980 जणांना प्राण गमवावे लागले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी 10 लाख 77,410 इतका झाला असून एकून 2 लाख 30,168 जणांना प्राण गमवावा लागला आहे. रैनानं ट्विट केलं की,''मीरट येथे राहणाऱ्या माझ्या काकीसाठी त्वरीत ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे. त्या 65 वर्षांच्या असून कोरोना मुळे त्यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला आहे. योगी आदित्यथान मला मदत करा.''


फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना यांच्यावरही कोरोना संकट?
कोरोना अहवाल येण्याच्या २-३ दिवसांपूर्वी मायकल हसीनं CSKच्या सराव सत्रात सहभाग घेतला होता आणि तो फॅफ ड्यू प्लेसिस व सुरेश रैना यांच्यासोबत चर्चा करताना दिसल्याची माहिती CSKच्या सदस्यानं दिली आहे.  ''कोरोना रिपोर्ट येण्याच्या 2-3 दिवस आधी हसीनं सराव सत्रात सहभाग घेतला होता. तो सर्वांमध्ये मिसळला होता. मी स्वतः त्याला फॅफ ड्यू प्लेसिस व सुरेश रैना यांच्यासोबत 15 ते 20 मिनिटे बोलताना पाहिले. त्यानं अऩ्य खेळाडूंसोबतही वेळ घालवला,''असे CSKच्या एका सदस्यानं InsideSport.co ला सांगितले.  

सुरेश रैनाचं ट्विट...
''हा मस्करीचा विषय नाही! अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत आणि यापूर्वी आयुष्यात एवढा हतबल कधी झालो नाही. आपल्याला किती मदत करायची आहे, हे महत्त्वाचे नाही, परंतु आता संसाधनेच अपुरे पडत आहेत. एकमेकांना मदत करून जीव वाचवणाऱ्या प्रत्येक भारतीय सॅल्यूटचा हकदार आहे.''  

Web Title: 'Urgent Requirement of an Oxygen Cylinder' - Suresh Raina Reaches Out to UP CM Yogi Adityanath For Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.