Join us  

भारत सोडून वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार अन् 3 खेळाडू अमेरिकेत टी-20 लीग खेळणार, पाकिस्तानी खेळाडूचा दावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अमेरिका प्रचंड मेहनत घेत आहेत. अमेरिकेनं संघ तयार करण्यासाठी अनेक माजी खेळाडूंची मदतही घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:09 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अमेरिका प्रचंड मेहनत घेत आहेत. अमेरिकेनं संघ तयार करण्यासाठी अनेक माजी खेळाडूंची मदतही घेतली आहे. त्यात अमेरिकाही आयपीएलच्या धर्तीवर ट्वेंटी-20 लीग खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकेत स्थायिक झालेला पाकिस्तानचा माजी सलामीवीर सामी असलम ( Sami Aslam) यानं एक धक्कादायक दावा केला आहे. या ट्वेंटी-20 लीगमध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु पाकिस्तानी व भारतीय खेळाडूंकडूनही त्यांच्याकडे विचारणा होत आहे. या लीगसाठी 30 ते 40 परदेशी खेळाडू अमेरिकेत आले आहेत आणि त्यात भारताचा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेता कर्णधार उन्मुक्त चंद, समित पाटिल आणि हरमीत सिंह यांचा समावेश असल्याचा खळबळजनक दावा अस्लमनं केला आहे.

Pakpassion.net शी बोलताना अस्लमनं हा दावा केला आहे. तो पुढे म्हणाला, न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर कोरी अँडरसनही येथे आला आहे. अरुणकुमार अमेरिकेचे मुख्य कोच आहेत आणि 2017मध्ये त्यांनी पंजाब किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षकाचं काम पाहिलं होतं, तेही या लीगचा भाग आहेत. 

उन्मुक्त चंदनं केलं वृत्ताचं खंडन  उन्मुक्त म्हणाला,''अमेरिकेत राहणाऱ्या नातेवाईकांकडे मी गेलो होतो आणि या दरम्यान मी फलंदाजी करण्यासाठी एक-दोन वेळा तेथे सराव सामना खेळलो. मी सराव सत्रातही सहभाग घेतला, याचा अर्थ मी अमेरिकेच्या ट्वेंटी-20 लीगसाठी गेलो, असा होत नाही.'' 

टॅग्स :उन्मुक्त चंदअमेरिका