Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई पंजाबविरुद्ध विजयी लय राखणार?

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज रविवारी किंग्ज इलेव्हन विरुद्ध आपली विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 05:32 IST

Open in App

मोहाली : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज रविवारी किंग्ज इलेव्हन विरुद्ध आपली विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर अत्यंत रोमहर्षक सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली.ड्वेन ब्राव्हो व सॅम बिलिंग्ज यांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने हे दोन्ही सामने जिंकले. त्या शिवाय संघात कर्णधार धोनी, सुरेश रैना, शेन वॉटसन, अंबाती रायुडू , फाफ डू प्लेसिस, रवींद्र जडेजा यांसारखे अनेक ‘मॅचविनर’ खेळाडू आहेत. गोलंदाजीत हरभजन, जडेजा इम्रान ताहिर, वॉटसन, शार्दूल ठाकूर यांनी आपली छाप पाडली आहे.दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पराभूत केले. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सात गड्यांनी पराभूत केले होते. के. एल. राहुलने या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते.युवराज सिंगची खराब कामगिरी हाच पंजाबचा डोकेदुखीचा विषय आहे. दोन सामन्यांत त्याने केवळ १२ धावा केल्या आहेत. आश्विनने फलंदाजी व गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. मात्र अ‍ॅरॉन फिंचही लौकिकास साजेशी कामगिरी करू शकला नाही.सामन्याची वेळ : रात्री ८ वाजतास्थळ : होळकर स्टेडियम, इंदोर

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीआयपीएल 2018