कोलकाता : वर्ल्ड चॅम्पियन भारताचा अंडर १९ संघ हा नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अव्वल होता, असे मत भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.रविवारी, सकाळी फुलमॅरेथॉननिमित्त सचिन तेंडुलकर येथे आला होता. तो म्हणाला, ‘त्यांनी ज्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिकरीत्या स्वत:ला तयार केले, ज्या प्रकारे त्यांची व्यूहरचना होती आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याची अंमलबजावणी केली याला तोड नव्हती.’भारताने शनिवारी न्यूझीलंडला फायनलमध्ये आॅस्ट्रेलियाला आठ गडी राखून पराभूत करताना अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता. तेंडुलकर म्हणाला की, ‘ही खूप मोठी उपलब्धी आहे. यासाठी एक संघाच्या रूपात कठोर मेहनतीची आवश्यकता असते. आम्ही असे करण्यात यशस्वी ठरलो. त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी बीसीसीआयलादेखील श्रेय जाते. गेल्या १५ वर्षांत खेळाचा दर्जा बदलला आहे.क्षेत्ररक्षणाचा दर्जाही बदलला आहे. हे यश मिळवणे चांगल्या पायाभूत सुविधा आणि दर्जेदार मैदानामुळे शक्य होऊ शकले.’सचिन तेंडुलकरने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सहकारी स्टाप व अन्य सदस्यांचीदेखील प्रशंसा केली. तो म्हणाला की, ‘त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. राहुल (प्रशिक्षक), पारस म्हाब्रे (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) आणि अभय शर्मा हेदेखील या उपलब्धतेचा भागीदार राहिले आहेत. या सर्वांसाठी ही मोठी उपलब्धी आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अंडर १९ संघ इतरांच्या तुलनेत अव्वल : तेंडुलकर
अंडर १९ संघ इतरांच्या तुलनेत अव्वल : तेंडुलकर
वर्ल्ड चॅम्पियन भारताचा अंडर १९ संघ हा नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अव्वल होता, असे मत भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:19 IST