Join us  

बंदी हटवण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूला भरावा लागला ४५ लाखांचा दंड!

पाकिस्तानचा वादग्रस्त फलंदाज उमर अकमल ( Umar Akmal) याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे ( Pakistan Cricket Board) ४५ लाखांचा दंड भरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:27 PM

Open in App

पाकिस्तानचा वादग्रस्त फलंदाज उमर अकमल ( Umar Akmal) याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे ( Pakistan Cricket Board) ४५ लाखांचा दंड भरला आहे. त्यामुळे तो आता बोर्डाच्या भ्रष्टाचारा विरोधी विभागाच्या पुनर्वसन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पात्र ठरला आहे. क्रीडा लवादानं अकमलवर दंडात्मक कारवाई केली होती आणि त्यानं ती रक्कम बोर्डाकडे जमा केली. याआधी अकमलवर १८ महिन्यांची बंदी कमी करून १२ महिन्यांची केली होती, परंतु त्याच्या दंडात्मक रकमेत वाढ केली गेली होती. ( Umar Akmal pays 4.5 million rupees fine, to take part in ACU’s rehab program) 

सूत्रांनी सांगितले की,'' उमरनं ४५ लाखांचा दंड पीसीबीकडे जमा केला आहे. याचा अर्थ तो बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पुनर्वसन कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतो. त्याला क्रिकेट कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा पाहावी लागेल. सध्या पाकिस्तान बोर्डाची भ्रष्टाचार विरोधी यूनिट पाकिस्तान सुपर लीगच्या आयोजनात व्यग्र आहे.'' उमरनं ही दंडाची रक्कम टप्प्यात भरण्याची विनंती केली होती, परंतु बोर्डानं ती नामंजूर केली. २०२०वर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. On This Day : सौरव गांगुली-राहुल द्रविड यांचा पराक्रम; वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच झालेली त्रिशतकी भागीदारी

अकमलनं त्याच्या याचिकेत म्हटले होते की,''बंदीची शिक्षा मिळाल्यामुळे आपण पैसे भरण्याच्या स्थितीत नाही. एकदम ४५ लाख भरण्याची एैपत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्यात ही रक्कम भरण्याची परवानगी मिळावी.'' पण, त्याची ही विनंती फेटाळली गेली. नोव्हेंबर २०१९पासून अकमल पाकिस्तान संघाबाहेरच आहे. त्यानं श्रीलंकाविरुद्ध लाहौर येथे अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. २०११मध्ये त्यानं अखेरचा कसोटी व मार्च २०१९मध्ये अखेरचा वन डे सामना खेळला होता. इरफान पठाणच्या पत्नीच्या फोटोवरून सुरू झालाय नवा वाद; क्रिकेटपटू म्हणतो, मी तिचा मालक नाही, जोडीदार!

उमरनं १६ कसोटीत ३५.८२च्या सरासरीनं १००३ धावा, १२१ वन डेत ३१९४ धावा आणि ८४ ट्वेंटी-२०त १६९० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तीन शतकं व ३४ अर्धशतकं आहेत.  

टॅग्स :पाकिस्तान