Join us  

अखेर ठरलं! यूएईमध्ये होणार आयपीएल २०२०; गव्हर्निंग काऊन्सिलच्या चेअरमनकडून दुजोरा

आयपीएल यूएईमध्ये होणार; पण तारखा अद्याप निश्चित नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 6:39 PM

Open in App

नवी दिल्ली: आशिया कप आणि टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यामुळे आता आयपीएल २०२० (IPL 2020) च्या आयोजनाचा रस्ता मोकळा झाला होता. मात्र ही स्पर्धा भारतात होणार की भारताबाहेर, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे चेयरमन बृजेश पटेल यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. आयपीएल २०२० यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचं पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितलं. मात्र या स्पर्धेची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचं ते म्हणाले.यूएईमध्ये आयपीएल २०२० आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत बृजेश पटेल यांनी दिली. मात्र या स्पर्धेच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील आठवड्यात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल आणि त्यामध्ये स्पर्धेच्या तारखा आणि संचालनाची प्रक्रिया निश्चित केली जाईल, अशी माहिती पटेल यांनी दिली.भारत सरकारनं परवानगी दिल्यानंतर आयपीएल २०२०चं वेळापत्रक तयार करण्यात येईल, असं पटेल यांनी पुढे सांगितलं. २८ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचं आयोजन करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र याबद्दलचं वृत्त पटेल यांनी फेटाळून लावलं. गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर वेळापत्रक निश्चित करण्यात येईल, असं ते म्हणाले. यूएईनं आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. आता लवकरच त्यांना स्पर्धेच्या तारखा आणि पूर्ण वेळापत्रक देण्यात येईल, असं पटेल यांनी मुलाखतीत सांगितलं.

यूएईकडून आयपीएलची तयारी सुरूयूएईनं आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएल डोळ्यासमोर ठेवून सुविधांची तयारी करत असल्याची माहिती दुबई स्पोर्ट्स सिटीचे हेड ऑफ क्रिकेट इव्हेंट्स सलमान हनीफ यांनी दिली होती. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज असल्याचं हनीफ यांनी गल्फ न्यूजशी संवाद साधताना म्हटलं होतं. दुंबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये नऊ खेळपट्ट्या असून त्यामुळे क्रिकेट सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करण्यास वेळ लागणार नसल्याचं हनीफ म्हणाले होते.रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; रेल्वेमंत्र्यांची माहितीफक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

टॅग्स :आयपीएल