Join us  

मॅच फिक्सिंग प्रकरणी आणखी दोन भारतीय क्रिकेटपटूंना अटक

मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरूतील पथकाने अटक केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 1:14 PM

Open in App

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)मधील सामन्यात मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरूतील पथकाने अटक केली आहे.

बंगळुरूमध्ये याआधी भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यानंतर कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. बंगळुरू ब्लास्टर्स टीमचे बॉलिंग प्रशिक्षक विनू प्रसाद आणि बॅटिंग प्रशिक्षक विश्वनाथन यांना मागच्या वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक केला होती.

सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 च्या मोसमात सहभागी होता. तसेच त्याला  मुंबई आणि दिल्ली संघाने देखील आपल्या संघात घेतले होते.

टॅग्स :मॅच फिक्सिंगआयपीएल