Join us  

आयपीएलमध्ये प्रेक्षकांना आणण्याचा प्रयत्न

इमिरेट्स बोर्ड : स्टेडियममध्ये ३० ते ५० टक्के उपस्थिती असावी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 5:14 AM

Open in App

नवी दिल्ली : सरकारने मंजुरी दिल्यास यूएईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी स्टेडियममध्ये ३० ते ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊशकतो, असे इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे सचिव मुब्बशीर उस्मानी यांनी शुक्रवारी सांगितले.मैदानात प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय यूएई सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल, असे आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी तारखांची घोषणा करताना म्हटले होते. तारखा जाहीर झाल्या तरी भारत सरकारने आयपीएल आयोजनास अद्याप मंजुरी प्रदान केलेली नाही.उस्मानी म्हणाले, ‘भारत सरकारकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर आम्ही आपल्या सरकारकडे प्रेक्षकांसाठी परवानगी मागू. आमच्या सरकारकडून प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. यूएईत सद्यस्थितीत कोरोनाबाधितांचा आकडा चिंता करण्यासारखा नाही. तरीही नोव्हेंबरमध्ये होणारे रग्बी सेव्हनचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.’ (वृत्तसंस्था)प्रत्येक खेळाडूची चारवेळा कोरोना चाचणीसध्या जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय सर्व संघांना कडक नियम आखून देणार आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल घोषणा होणार असल्याचे कळते.जी नियमावली तयार होणार त्यात प्रेक्षकांना मैदानात परवानगी राहणार नाही. स्टुडिओमध्ये समालोचन करणारी मंडळी सहा फुटांचे अंतर राखून बसतील. डग आऊटमध्ये खेळाडूंची कमी गर्दी, ड्रेसिंग रूममध्ये १५ पेक्षा जास्त खेळाडूंना परवानगी राहणार नाही. प्रत्येक खेळाडूची दोन आठवड्यात चारवेळा चाचणी आणि शारीरिक अंतराचा नियम पाळणे बंधनकारक असेल. नियमांची कल्पना संघमालकांनाही दिली आहे.पत्नी आणि गर्लफ्रेंड यांना यूएईला येऊ द्यायचे की नाही हा निर्णय बीसीसीआय घेणार नाही, आम्ही तो त्या-त्या संघमालकांवर सोडला आहे. पण आम्ही तयार केलेल्या नियमांचे प्रत्येकाला पालन करावे लागेल. संघाचा बसचालकही ‘जैव सुरक्षा बबल’ सोडून जाऊ शकणार नाही. पुढील आठवड्यात बैठक पार पडल्यानंतर प्रत्येक संघमालकांना मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम दिले जातील. काही समस्या असेल तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात, त्यावर तोडगा काढता येईल,’असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :आयपीएल 2020