Join us  

तिरंगी मालिकेची धुरा यंगिस्तानवर; कोहली, धोनीला विश्रांती

श्रीलंकेत ६ मार्चपासून सुरू होणा-या टी-२0 तिरंगी मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली आणि संघातील सर्वात सिनिअर खेळाडू महेंद्रसिंग धोनीसह अनेक महत्त्वपूर्ण खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत आता युथ ब्रिगेड भारताची खिंड लढवणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:28 AM

Open in App

नवी दिल्ली : श्रीलंकेत ६ मार्चपासून सुरू होणा-या टी-२0 तिरंगी मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली आणि संघातील सर्वात सिनिअर खेळाडू महेंद्रसिंग धोनीसह अनेक महत्त्वपूर्ण खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत आता युथ ब्रिगेड भारताची खिंड लढवणार आहे.संघात देशांतर्गत स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाºया खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. संघात ६ बदल करण्यात आले आहे आणि त्यात शिखर धवनला उपकर्णधार नेमण्यात आले आहे.महेंद्रसिंग धोनीने विश्रांतीसाठी आग्रह केला होता. त्याचप्रमाणे, अपेक्षेनुसार भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय हार्दिक पांड्या यांनादेखील विश्रांती देण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, निदाहस ट्रॉफीसाठी संघाला अंतिम स्वरूप देताना खेळाडूंवरील ओझे आणि आगामी वेळापत्रक लक्षात घेण्यात आले. वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा आणि दुखापतीतून वाचवण्यासाठी त्यांना पुरेशी विश्रांती दिली जावी, असा सल्ला हाय परफॉर्मन्स संघाने दिला आहे.निवड समितीने डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२0 मालिकेत खेळणाºया सर्व खेळाडूंना निवडले आहे. राष्ट्रीय टी-२0 आणि वनडे स्पर्धेत शानदार कामगिरी करणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचेही संघात पुनरागमन झाले आहे.श्रीलंकेविरुद्ध देशांतर्गत मालिकेनंतर आॅफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू दीपक हुड्डा पुन्हा एकदा संघात असतील.अष्टपैलू विजय शंकर याला पांड्याचा पर्याय म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. दिनेश कार्तिक यष्टीरक्षक असेल, तर पंत फलंदाज म्हणून खेळू शकतो. तथापि, या हंगामात देशांतर्गत स्पर्धेत २000 पेक्षा जास्त धावा फटकावणाºया मयंक अग्रवाल याला स्थान मिळाले नाही.आम्ही आक्रमक खेळ केला : रोहितकेपटाऊन : भारतीय संघ कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होता आणि सर्वांनी आक्रमक खेळ केला. त्यामुळे मर्यादित षटकांच्या मालिका जिंकता आल्या, अशी प्रतिक्रिया भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करीत, ३ टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. त्यानंतर, रोहितने भारताच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली.काय म्हणाला रोहित शर्मा-मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्ही वर्चस्व गाजवले. संघ म्हणून आम्ही कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होतो. त्यामुळे आम्हाला मालिका जिंकता आली.’आम्ही आखलेल्या योजना यशस्वी ठरल्या. आम्ही यष्टिच्या रोखाने मारा करण्याची योजना आखली होती. पहिल्या सहा षटकांमध्ये नियोजनबद्ध मारा केला. त्याचे श्रेय गोलंदाजांना द्यायलाच हवे.आम्ही अपेक्षेपेक्षा किमान १५ धावा कमी केल्या होत्या. मध्यंतरानंतर आम्ही लय गमावल्याचे वाटत होते. अशा बाबी घडत असतात आणि त्यातून बोध घेणे आवश्यक आहे. माझ्या मते ही चांगली धावसंख्या होती आणि गोलंदाजांनी चांगले काम केले.जेपी ड्युमिनी म्हणतो... भारतीय खेळाडूंनी पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली. पॉवरप्लेमध्ये त्यांच्या व आमच्या कामगिरीमध्ये ३० धावांचा फरक होता.

टीम इंडिया-रोहित शर्मा (कर्णधार),शिखर धवन, लोकेश राहुल,सुरेश रैना, मनीष पांडे,दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघक्रिकेट