Join us  

IPL 2021 पूर्ण होणार, BCCIनं घेतली परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी; IPL COOचं मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंमध्येही भीतीचं वातावरण आहे. केन रिचर्डसन, अॅडम झम्पा, लायम लिव्हिंगस्टोन, अँड्य्रू टाय या परदेशी खेळाडूंनी याच भीतीतून आयपीएलमधून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 3:29 PM

Open in App

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील काही दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंमध्येही भीतीचं वातावरण आहे. केन रिचर्डसन, अॅडम झम्पा, लायम लिव्हिंगस्टोन, अँड्य्रू टाय या परदेशी खेळाडूंनी याच भीतीतून आयपीएलमधून माघार घेतली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्यांच्या सरकारकडे प्रायव्हेट जेटची मागणी केली आहे, तर न्यूझीलंडचे खेळाडूही मायदेशात जाण्याचा विचार करत आहे. अशात त्यांना आयपीएलनंतर मायदेशात जायचं कसं, हा प्रश्नही सतावत आहे. पण, आयपीएलचे COO हेमांग आमीन यांनी सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्यांना आश्वासन दिलं आहे. कोरोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या भारतीयांसाठी पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमची प्रार्थना!

जोपर्यंत सर्व खेळाडू त्यांच्या देशात सुखरूप पोहोचत नाहीत, तोपर्यंत बीसीसीआयसाठीआयपीएल २०२१ संपलेली नसेल, असे अश्वासन आमीन यांनी देताना आयपीएल २०२१ पूर्ण होणार असा सूर आवळला आहे. आमीन यांनी सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्याला पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी क्रिकेटपटूंना वाटत असलेल्या भीतीचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जोपर्यंत सर्व खेळाडू आपापल्या घरी सुखरूप पोहोचत नाही, तोपर्यंत बीसीसीआयसाठी ही स्पर्धा संपणार नाही, असे नमूद केले आहे. Play & Win: चेन्नईकडून एकाच सामन्यात ५०+ धावा अन् ३ + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू कोण?; उत्तर द्या...बक्षिस जिंका!

''स्पर्धा संपल्यानंतर घरी कसं जायचं, ही चिंता अनेक खेळाडूंना सतावत आहे, याची मला कल्पना आहे. भीती वाटणे हा मानवी स्वभाव आहे आणि आम्ही तो समजू शकतो. मी तुम्हाला आश्वासन देतो की, चिंता करू नका. तुम्हाला तुमच्या घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी ही बीसीसीआयची आहे आणि ते त्यांच्यापरीनं सर्वतोपरी प्रयत्न करतील. बीसीसीआय सद्यपरिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत आणि खेळाडूंना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी बीसीसीआय सरकारसोबत काम करत आहे. जोपर्यंत तुम्ही सुखरूप घरी जात नाहीत, तोपर्यंत बीसीसीआयसाठी ही स्पर्धा संपलेली नसेल, याची मी तुम्हाला खात्री देतो.''असे आमीन यांनी सांगितले.

बायो बबलचे नियम अधिक कठोर करण्यात आल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. ''बायो बबलचे नियम अधिक कठोर करण्यात येत असून प्रत्येकाची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे. नुकतंच आम्ही टेस्ट वाढवल्या आहेत. सुरुवातीला आम्ही पाच दिवसांनी टेस्ट करायचो आणि आता दर दोन दिवसांनी केली जाते. आधी हॉटेलबाहेरील खाण्याला परवानगी दिली गेली होती, परंतु आता तसं करता येणार नाही.''

खेळाडूंचे मानले आभारकोरोना संकटात लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम तुम्ही करत आहात. क्रिकेटमुळे थोडावेळ हा होईना प्रत्येक व्यक्ती कोरोना विसरून आनंद एंजॉय करतोय. तुम्ही अत्यंत महत्त्वाचे काम करत आहात, असेही आमीन यांनी नमूद केले.

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्याबीसीसीआय