Join us  

पूर्णपणे बेजबाबदार!; रोहित शर्माच्या 'त्या' फटक्यावर आजी-माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली नाराजी

शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, गिल माघारी परतला. रोहित व चेतेश्वर पुजारा ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: January 16, 2021 1:02 PM

Open in App

India vs Australia, 4th Test Day 2 : रोहित शर्माला ( Rohit Sharma) पुन्हा एकदा आक्रस्ताळेपणा नडला. कसोटी क्रिकेटमध्ये संयम किती गरजेचा असतो, याचा विसरच त्याला कदाचित पडलेला पाहायला मिळाला. त्यामुळे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याचा मोह तो आवरू शकला नाही. रोहित ४४ धावांवर माघारी परतला आणि नेटिझन्सनी त्याच्या बेजबाबदार फटक्याचा समाचार घेतला.  शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, गिल माघारी परतला. रोहित व चेतेश्वर पुजारा ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. लियॉनचा चेंडू सीमापार मारण्याच्या प्रयत्नात मिचेल स्टार्कच्या हाती झेल देऊन रोहित माघारी परतला. त्यानं ७४ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. त्याच्या या फटक्यावर आजी-माजी खेळाडू खवळले.  दरम्यान पावसामुळे खेळ थांबवावा लागला  आणि तेव्हा टीम इंडियानं 2 बाद 62 धावा केल्या होत्या.

व्हिडीओ...गावस्कर काय म्हणाले ते पाहा...या घाईनंतर सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी रोहितचे जाहीर वाभाडे काढले. ते म्हणाले,''कशाला?, कशाला?, कशाला?; असा फटका मारण्याची गरजच काय. लाँग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगला फिल्डर असताना असा बेजबाबदार फटका मारण्याची गरज नव्हती. काही वेळापूर्वीच तू चौकार खेचले होतेस, मग घाई कशाला?, तू संघातील सीनिअर खेळाडू आहेस, या बेजबाबदार फटक्यासाठी काहीच कारण खपवून घेतले जाणार नाही. ही विकेट गिफ्ट दिलीस.''

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मा