- सौरभ गांगुली लिहितात...कानपूरमध्ये चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव घेता आला. कारण, विशाल लक्ष्याला सामोरे जाताना न्यूझीलंडने गुडघे टेकले नाही. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात सरस कामगिरी केल्यामुळे भारताला थरारक विजय मिळवता आला.कानपूरची खेळपट्टी वेगळीच होती. पूर्वीच्या संथ व उसळी नसलेल्या खेळपट्टीच्या तुलनेत या खेळपट्टीचा दर्जा वेगळाच होता.रोहित शर्माने वन-डे क्रिकेटमधील फॉर्म कायम राखला. हाच फॉर्म त्याला कसोटी कारकिर्दीत कायम राखता येईल, असे वाटते. रोहित वकोहली यांनी केलेली द्विशतकी भागीदारी केवळ चाहत्यांना सुखावणारीच नव्हती तर त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली आणि दवाच्या प्रभावात गोलंदाजांना बचाव करण्यासाठी अतिरिक्त धावाही मिळाल्या.प्रथम फलंदाजी करताना विराट अँड कंपनीला मोठी धावसंख्या उभारणे आवश्यक होते. कारण दवाचा प्रभाव पडला तरी गोलंदाजांना त्यामुळे अतिरिक्त कुशन मिळते व प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचे दडपण असते. त्यामुळे कानपूरमध्ये मिळविलेला विजय सुखावणारा होता. न्यूझीलंडची जशी स्थिती होती तशी स्थिती भारताची असती तर आपणलढत गमावली नसती. भारताच्या विजयाचे सर्व श्रेय बुमराह व भुवी यांच्या स्लॉग ओव्हर्समधील गोलंदाजीला जाते. पहिल्या स्पेलमध्ये महागडा ठरल्यानंतर भुवीने अखेरच्या स्पेलमध्ये दमदार पुनरागमन करीत अचूक मारा केला.आता लक्ष टी-२० क्रिकेटवर केंद्रित झाले आहे. ही मालिकाही चुरशीची होईल. यापूर्वीभारत दौ-यावर आलेल्या न्यूझीलंड संघाच्या तुलनेत यावेळचा संघ चांगला भासत आहे. त्यांच्या सिनिअर तीन खेळाडूंकडून मोठे योगदान मिळाले नसतानाही त्यांनी अखेरपर्यंत लढत दिली.दिल्ली येथे खेळली जाणारी पहिली टी-२० लढत आशिष नेहराची खेळाडू म्हणून अखेरची आंतरराष्ट्रीय लढत राहणार आहे. त्यामुळे या लढतीला भावनेची किनार प्राप्त झाली आहे. दुखापतीतून सावरत त्याने अनेक वर्षे क्रिकेटला दिले, यावरून त्याच्या या खेळावरील प्रेमाची प्रचिती येते. प्रतिभा, तंत्र आणि निश्चय या सर्वांचा मेळ नेहरामध्ये दिसून येतो. तो संघाचा शानदार सदस्य आहे.कर्णधाराने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यास तो नेहमीच सज्ज असतो. कुठल्याही क्रिकेटसोबत त्याची जुळवून घेण्याची क्षमता प्रभावित करणारी आहे. त्याचप्रमाणे यश मिळवण्याच्या इच्छाशक्तीमुळे त्याला पुनरागमन करता आले. त्यामुळे भारतीय संघाने त्याच्या गृहमैदानावर त्याला विजयाने निरोप द्यावा, अशी माझी इच्छा आहे. हिवाळ्याचीचाहूल लागल्यामुळे कोटलावरील सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. (गेमप्लान)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कोटलावरील सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार
कोटलावरील सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार
कानपूरमध्ये चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव घेता आला. कारण, विशाल लक्ष्याला सामोरे जाताना न्यूझीलंडने गुडघे टेकले नाही. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात सरस कामगिरी केल्यामुळे भारताला थरारक विजय मिळवता आला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:37 IST