पुणे : भारतीय फिरकीपटूंविरुद्ध आमची विशेष रणनीती आहे. भारतीय फिरकीपटूंविरुद्ध हवेत फटके मारण्यापेक्षा आम्ही त्यांच्याविरुद्ध स्वीप खेळण्यास अधिक पसंती देऊ, असे न्यूझीलंडचा यष्टिरक्षक-फलंदाज टॉम लॅथम याने सांगितले. लॅथमने मुंबईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फिरकीविरुद्ध स्वीप आणि रिव्हर्स स्वीप फटक्यांच्या जोरावर शतक झळकावून न्यूझीलंडचा विजय साकारला होता. पुण्यात होत असलेल्या दुसºया एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला लॅथमने सांगितले, ‘प्रत्येक खेळाडू विविध परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फिरकी गोलंदाजी खेळतो. भारतीयांची फिरकी पद्धत वेगळी आहे. त्यांना या परिस्थितीमध्ये खेळण्याची सवय असून त्यांनी आपला खेळ दाखवला आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये स्वीप फटके खेळले असून मला उंच फटके खेळण्यापेक्षा स्वीप फटके खेळणे जास्त आवडतं.’