Join us  

टी-२० विश्वचषकाचा थरार आजपासून! १६ संघ, २९ दिवस, ४५ सामने; पात्रता फेरीनंतर सुपर १२ सामने

झटपट क्रिकेटच्या महाकुंभाला रविवार १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 7:37 AM

Open in App

मेलबोर्न: झटपट क्रिकेटच्या महाकुंभाला रविवार १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होत आहे. हा आठवा टी-२० विश्वचषक असेल.  २९ दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत ४५ सामने खेळले जातील. अंतिम लढत १३ नोव्हेंबर रोजी होईल.

मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईत आयोजन झाले, पण खरे तर हे आयोजन २०२० ला व्हायचे होते.  दरम्यान, यदा १६ संघ सहभागी होत असून त्यातील १२ संघ थेट खेळणार असून चार संघ पात्रता फेरीद्वारा येतील. पात्रता फेरी १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान आणि त्यानंतर सुपर १२ फेरी २२ ऑक्टोबरपासून खेळली जाईल. पात्रता फेरीत सलामीचा सामना आज रविवारी श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यात सकाळी ९.३० पासून खेळला जाईल. 

४६ कोटींचे रोख पुरस्कार

या स्पर्धेत एकूण ४६ कोटी ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके असतील. विजेत्या संघाला आकर्षक चषकासह १३ कोटी १७ लाख तर उपविजेत्या संघाला ६ कोटी ६० लाख रुपये मिळतील. 

सर्वांत युवा, सर्वांत प्राैढ

या स्पर्धेत सर्वांत प्रौढ संघ ऑस्ट्रेलिया असेल. या संघातील खेळाडूंच्या वयाची सरासरी ३१.१३ तर सर्वांत युवा असलेल्या अफगाणिस्तान संघातील खेळाडूंच्या वयाची सरासरी २३.७३ इतकी आहे. स्पर्धेतील सर्वांत युवा खेळाडू यूएईचा अफझल खान आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App