Join us  

भारताबाहेरही आयपीएल आयोजनाचा विचार

बीसीसीआयची योजना : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबतच्या निर्णयाची असेल प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 4:56 AM

Open in App

नवी दिल्ली : भारताबाहेर यंदा आयपीएलचे आयोजन करणे बीसीसीआयकडे अखेरचा पर्याय असेल. दरम्यान, बोर्डाने आयपीएल आयोजनासंदर्भात योजना आखायला सुरुवात केली आहे. देशात अडथळे आल्यास हे आयोजन देशाबाहेरही करण्याचा पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या सत्राचे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित केले होते. कोरोनामुळे जगात क्रिकेटसह सर्वच खेळ ठप्प आहेत.दरम्यान जर्मनी, हंगेरी आणि इटलीसारख्या ठिकाणी फुटबॉल लीग तसेच द. कोरियात रग्बी लीग खेळविण्यात आली. कोरोनाचा धोका कायम असताना आंतरराष्टÑीय क्रिकेटचे पुनरागमन मात्र जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारेच शक्य होऊ शकेल.

या दरम्यान बीसीसीआय आयपीएल आयोजनाबाबत काही योजना पुढे करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही कारणास्तव देशात शक्य नसेलतर देशाबाहेर आयपीएलचेआयोजन करण्याची बोर्डाची तयारी आहे.बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड सध्या सर्वच पर्याय पडताळून पाहत आहे. आयपीएल भारताबाहेर करावे लागल्यास त्याचीही तयारी असायला हवी. मात्र हा अखेरचा पर्याय असेल.हाच एकमेव पर्याय कायम असेल तर त्यावरही विचार होईल. याआधी दोनदा असे केलेदेखील. यंदा मात्र भारतातच आयपीएल आयोजनास आमचे प्राधान्य असेल, असे या सूत्रांनी सांगितले. आयपीएलला २९ मार्च रोजी सुरुवात होणार होती, मात्र कोरोनामुळे आयोजन स्थगित झाले. (वृत्तसंस्था)

लवकरच स्पष्ट होईल आयसीसीची भूमिकाभारतात सार्वत्रिक निवडणुकांमुळे २००९ मध्ये द. आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. २०१४ लादेखील या स्पर्धेचे काही सामने यूएईत पार पडले. टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय आयसीसीने १० जूनपर्यंत लांबणीवर टाकला आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार आॅस्ट्रेलियात होणाºया टी-२० विश्वचषकाबाबत अद्याप कुठला निर्णय झालेला नाही. ही स्पर्धा १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत प्रस्तावित असून, विश्वचषकाचे आयोजन रद्द झाल्यास त्याच ‘विंडो’मध्ये आयपीएलचे आयोजन होऊ शकते. सूत्रानुसार विश्वचषक आयोजनाबाबत आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे योग्य ठरणार आहे. चित्र स्पष्ट होईपर्यंत आयपीएल आयोजनाचा विचार प्रत्यक्षात उतरू शकणार नाही.

टॅग्स :आयपीएल 2020