Join us  

'ओली पोप को लॉलिपॉप दो', 'बॉल घुमेगा तो ये झुमेगा', रिषभ पंतची यष्टींमागून फटकेबाजी, Video Viral

India vs England 2nd Test Rishabh Pant: स्टंप्समागून ऋषभ पंतची भन्नाट कॉमेंट्री; ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 9:45 AM

Open in App

चेन्नई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिरक्षक ऋषभ पंतनं शानदार कामगिरी केली. ब्रिस्बेनच्या अंतिम आणि निर्णायक कसोटीत भारतानं शेवटच्या दिवशी तीनशेपेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्या विजयात ऋषभ पंतचं मोलाचं योगदान होतं. त्यासाठी पंतचा सामनावीर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. या दौऱ्यात पंत स्टंप्सच्या मागून करत असलेल्या भन्नाट समालोचनाचीदेखील चर्चा झाली. यानंतर आता चेन्नईत सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही (India vs England 2nd Test) पंतची भन्नाट बोलंदाजी पाहायला मिळते आहे. (Rishabh Pant's stump mic chatter)ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना 'स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तुने चुराया मेरे दिल का चेन', असं गाणं गुणगुणणाऱ्या पंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर आता इंग्लंडविरुद्ध यष्टिरक्षण करत असताना पंतकडून भन्नाट समालोचन सुरू आहे. पंतचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. अनेकांनी पंतच्या बोलंदाजीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहलीचा आवाजही ऐकू येत आहे.  इंग्लंडचा फलंदाज लॉरेन्स खेळत असताना पंत फिरकीपटू अक्षर पटेल सूचना करत होता. 'अँगल बहुत तगडा है तेरा, खेलना ही पडेगा,' असं पंतनं म्हटलं. त्यानंतर लॉरेन्स काही चेंडू बॅकफूटवर जाऊन खेळला. त्यावर 'पहले से पिछे खडा है. मुह पे भी डाल सकता है इसको' अशी मजेशीर कमेंट पंतनं केली. यासोबतच 'ओली पोप को लॉलिपॉप दो', 'बॉल घुमेगा तो ये झुमेगा', 'थोडासा आगे, मिल्खा सिंग भागे,' अशा आणखीही काही भन्नाट कमेंट्स पंतनं स्टंप्सच्या मागून केल्या. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेरीस भारत मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या डावात भारताच्या १ बाद ५४ धावा झाल्या आहेत. भारताकडे एकूण २४९ धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतानं ३२९ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा धावा १३४ धावांत आटोपला. रवीचंद्रन अश्विननं ४३ धावांत पाहुण्यांचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याला फिरकीपटू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत उत्तम साथ दिली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतआर अश्विन