Join us  

तिसरी टी-20 : निर्णायक लढतीत कुलदीप, चहलवर दडपण

दुसऱ्या सामन्यात तयारीनिशी उतरून फिरकीला पुरून उरणाºया इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्यावर दडपण आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 2:09 AM

Open in App

ब्रिस्टल  - दुसऱ्या सामन्यात तयारीनिशी उतरून फिरकीला पुरून उरणाºया इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्यावर दडपण आले आहे. उभय संघांदरम्यान टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज रविवारी रंगणार आहे.मॅनचेस्टरमध्ये झालेल्या पराभवानंतर यजमान फलंदाजांनी दोघांच्याही फिरकीचा अभ्यास केला आणि दुसºया सामन्यात यशस्वीपणे तोंड दिले. खरे सांगायचे तर श्रीलंका, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेसारखे मातब्बर संघ देखील चहल-कुलदीप यांच्या फिरकीवर अद्याप तोडगा काढू शकलेले नाहीत. या दोघांना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जाळ्यात ओढण्याचे तंत्र नव्याने शोधावे लागेल. कालच्या सामन्यात अखेरच्या षटकांत जसप्रीत बुमराह याची उणीव जाणवली.इंग्लंडने फलंदाजी क्रम बदलला होता. ज्यो रुट याला चौथ्या स्थानावर पाठविण्यात आले. त्यानंतर मोर्गन स्वत: आला. यामुळे सामनावीर अ‍ॅलेक्स हेल्स याला मोठी भागीदारी करता आली. तो जखमी बेन स्टोक्सच्या जागी आला आहे. आजच्या सामन्यात स्टोक्स स्वत: खेळेल. (वृत्तसंस्था)भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव.इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जानी बेयरस्टो, जॅक बॉल, जोस बटलर, सॅम कुर्रान, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियॉम प्लंकेट, आदिल राशिद, ज्यो रूट, जेसन रॉय, डेव्हिड विली, डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्स.सहावा मालिका विजय होणार भारताला सलग सहावी मालिका जिंकण्याची संधी असेल. सप्टेंबर २०१७ पासून विजयी घोडदौड सुरू झाली. त्याआधी, जानेवारी २०१७ ला स्थानिक मालिकेत भारताने ०-१ ने माघारल्यानंतरही इंग्लंडला २-१ ने पराभूत केले होते. बेंगळुरु येथील सामन्यात चहलने २५ धावांत सहा गडी बाद करीत करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती.पूर्वतयारीचा इंग्लंडला लाभ- विराटकार्डिफ : भारतीय गोलंदाजांविरुद्ध इंग्लंडने जी तयारी केली त्याचा त्यांना फायदा झाल्याचे विराटने कालच्या दुसºया टी-२० सामन्यातील पराभवाचे विश्लेषण करताना सांगितले. यजमानांनी कुलदीपच्या गोलंदाजीचा अभ्यास केल्यामुळेच ते सरस ठरले व फरक पडल्याचे विराटचे मत होते.दुसºया सामन्यात यजमान आमच्यापेक्षा सरस ठरले, शिवाय त्यांनी १५० धावांचे विजयी लक्ष्य सहज गाठल्याचीही विराटने कबुली दिली. इंग्लंडने भारतावर पाच गड्यांनी मात करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने दिलेल्या १४९ या धावसंख्येचा पाठलाग करताना सामन्याचा हिरो अ‍ॅलेक्स हेल्सने नाबाद अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हेल्सने जोरदार हल्ला चढवून विजय निश्चित केला. भारताचे फिरकी गोलंदाज दुर्दैवाने इंग्लंडच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले.आम्ही पाच षटकांत आघाडीची फळी गमावली. याच गोष्टीमुळे सामना यजमानांकडे झुकला. सुरुवातीला तीन गडी गमविल्यानंतर सामन्यात परतणे फार कठीण होते. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत आम्हाला खराब फटके मारण्यास भाग पाडले. यामुळेदेखील १०-१५ धावा कमी पडल्याचे विराटचे मत होते.उमेशने १९ व्या षटकांत भेदक मारा केला पण अखेरच्या चेंडूवर चौकार लागणे हे देखील पराभवाचे एक कारण होते, असे विराटने स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)इंग्लंडने चुका सुधारल्या : युजवेंद्र चहलकार्डिफ: पहिल्या सामन्यात झालेल्या चुका सुधारून इंग्लंडने दमदार कामगिरी केली व बरोबरी साधण्यात यश मिळविल्याचे भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने मत आहे. कुलदीपचा मारा सावध खेळण्याचे तंत्र अवलंबून अन्य गोलंदाजांना चांगलेच धुतले. सामना जिंकण्याची संधी हातात येताच अखेरच्या षटकात इंग्लंडने कुलदीपचे चेंडू देखील हिट केले. आमचा मारा चांगलाच होता, पण इंग्लिश फलंदाजांनी चुकांवर नियंत्रण मिळविल्याने त्यांचा विजय झाला, असे चहल म्हणाला.

 

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध इंग्लंड