नवी दिल्ली : जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलची वाट पाहत असतात. यंदा आयपीएलला सुरूवात करण्यात आली. मात्र बायोबबलच्या उल्लंघनानंतर आणि खेळाडूच कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा त्यावेळी बंद करण्यात आली. आता दुबईत आयपीएलची दुसरी फेरी होणार यात उरलेल्या सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होईल. मात्र यावेळी जोश बटलर, पॅट कमिन्स, जोफ्रा आर्चर हे खेळाडू दिसणार नाही. त्यांच्यासह काही प्रमुख खेळाडू स्पर्धेबाहेर गेले आहेत.
डॅनियल सॅम्स
खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा आता सर्वत्र मांडला जात आहे. बेन स्टोक्स याने देखील अनिश्चीत काळासाठी माघार घेतली आता ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅम्स याने देखील याच कारणाने माघार घेतली आहे. तो आरसीबीच्या संघात होता.
रिले मेरेडीथ
ऑस्ट्रेलियाचा युवा जलदगती गोलंदाज पंजाब किंग्ज कडून खेळत होता. मात्र त्याने युएईत होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
पॅट कमिन्स
कोलकाता नाईट रायडर्सचा तो एक प्रमुख खेळाडू आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीचा केकेआर नक्कीच मोठा धक्का बसु शकतो. त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.
ॲडम झम्पा
रॉयल चँलेजर्स बँगलोरचा हा खेळाडू आयपीएल २०२१ मध्ये खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या टी २० विश्वचषक संघात त्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे झम्पा या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
जोफ्रा आर्चर
इंग्लंडचा हा जलदगती गोलंदाज कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो देखील यास्पर्धेत खेळणार नाही. तो सध्या इंग्लंड संघातून देखील बाहेर आहे. तो राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीचा कणा आहे.
जोस बटलर
राजस्थान रॉयल्सचा हा खेळाडू युएईत होणाऱ्या आयपीएलच्या फेरीत सहभागी होणार नाही. त्याची पत्नी गर्भवती आहे. आणि होणाऱ्या बाळासाठी तो या वेळी खेळणार नसल्याचे त्याने कळवले आहे. त्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सला मोठा फटका बसेल.
जाय रिचर्डसन
ऑस्ट्रेलियाचा हा जलदगती गोलंदाज देखील आयपीएलच्या या फेरीत खेळणार नाही. तो देखील पंजाब किंग्ज कडून खेळत होता.
केन रिचर्डसन
झम्पाचा ऑस्ट्रेलियन सहकारी केन रिचर्डसन हा देखील आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता. जलदगती गोलंदाजाने देखील टी२० विश्व चषकासाठी माघार घेतली आहे.
फिन ॲलेन
न्युझीलंडचा हा धडाकेबाज फलंदाज देखील राष्ट्रीय संघात निवडला गेला आहे. त्यामुळे तो युएईत होणाऱ्या इंडियन प्रीमीयर लिगच्या फेरीतून बाहेर पडला आहे.