Join us  

या क्रिकेटपटू बंधूंना दोन वेळचं जेवणंही मिळत नव्हतं...

या दोघांनांही लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांना दोन वेळचं जेवणही नीट मिळवत नव्हतं. पण तरीही त्यांनी क्रिकेट खेळायचं सोडलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 4:14 PM

Open in App
ठळक मुद्देदस्तुरखुद्द नीता अंबानी यांनीही त्यांचे कौतुक केले, पण त्यावर त्या थांबल्या नाहीत. तर या दोघांच्या संघर्षाची कहाणी त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितली आणि श्रोत्यांनाही प्रेरणा मिळाली.

मुंबई : माणसाला आयुष्यात कसलं तरी वेड नक्की असावं तरच ती व्यक्ती आपल्या आवडत्या क्षेत्रात भरारी घेऊ शकते. अशीच गोष्ट या दोन क्रिकेटपटू बंधूंची. या दोघांनांही लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांना दोन वेळचं जेवणही नीट मिळवत नव्हतं. पण तरीही त्यांनी क्रिकेट खेळायचं सोडलं नाही.

या दोघांनाही क्रिकेटचं वेड एवढं होतं की फक्त तिनशे रुपयांच्या मानधनावरही ते कुठेही खेळायला जायचे. सामना खेळण्यासाठी जाताना कोणतं वाहनंही त्यांच्याकडे नव्हतं. कधी पायपीट करत, तर कधी रेल्वेने ते प्रवास करायचे. त्यांचा खेळ मात्र चांगलाच बहरत होता. आयपीएलमधील मुंबई इंडियन्समधील काही लोकांनी त्यांचा खेळ पाहिला आणि त्यांना संघात सामील करून घेतलं. त्यानंतर मात्र या दोघांनी मागे वळून पाहिलं नाही. कारण मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्यांनी कामगिरीच्या जोरावर नाव कमावले आणि आता चाहत्यांच्या गळ्यातील ताईतही झाले. दस्तुरखुद्द नीता अंबानी यांनीही त्यांचे कौतुक केले, पण त्यावर त्या थांबल्या नाहीत. तर या दोघांच्या संघर्षाची कहाणी त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितली आणि श्रोत्यांनाही प्रेरणा मिळाली. ही कहाणी आहे हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंची.

पंड्या बंधूंबाबत अंबानी म्हणाल्या की, " गुजरातच्या एका गरीब कुटुंबामध्ये हार्दिक आणि कृणाल या बंधूंचा जन्म झाला. पण या दोघांनी क्रिकेटसाठी कसलीही पर्वा केली नाही. काही वेळा त्यांना दोन वेळचे जेवणंही मिळत नव्हते. फक्त 300 रुपयांसाठी ते क्रिकेटचे सामने खेळायचे. "

अंबानी यांच्या या वक्तव्यावर हार्दिकने त्यांचे आभार मांडले आहेत. समाजमाध्यमांवर त्याने आपला संदेश पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये हार्दिक म्हणाला की, " क्रिकेट खेळत असताना आणि वैयक्तिक आयुष्यातही अंबानी कुटुंबियांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. कमी कालावधीमध्ये आम्हाला जे घवघवीत यश मिळाले आहे, त्यामध्ये अंबानी परीवाराचाही मोलाचा वाटा आहे. या साऱ्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद."

टॅग्स :हार्दिक पांड्याआयपीएलक्रिकेट