खरमरीत टीकेनंतरही रायुडूवर कारवाई नाही: बीसीसीआय

विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात निवड समितीने अंबाती रायुडूला डावलले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:34 AM2019-04-18T04:34:02+5:302019-04-18T04:34:17+5:30

whatsapp join usJoin us
 There is no action against Rayudu after the criticism: BCCI | खरमरीत टीकेनंतरही रायुडूवर कारवाई नाही: बीसीसीआय

खरमरीत टीकेनंतरही रायुडूवर कारवाई नाही: बीसीसीआय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात निवड समितीने अंबाती रायुडूला डावलले. रायुडू या गोष्टीमुळे निराश झाला आणि त्यानंतर त्याने संघ निवडीवर टिष्ट्वटरवरून खरमरीत टीका केली.
‘आता थ्री-डी गॉगल घालून मी विश्वचषक पाहणार ,’ अशी टीका करताना रायुडूने विश्वचषकातील संघात माझी निवड केली नाही, पण मी विश्वचषकात खेळतो आहे, हा आभास निर्माण करण्यासाठी आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार असल्याचे या पोस्टच्या माध्यमातून म्हटले होते. रायुडूच्या या बोचऱ्या टीकेनंतरही त्याच्यावर कुठलीही कारवाई करणार नसल्याचे बीसीसीआयने बुधवारी स्पष्ट केले.

Web Title:  There is no action against Rayudu after the criticism: BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.