Wasim Akram: "संपूर्ण जग सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानते, पण पाकिस्तानात मला फिक्सर म्हणतात", वसिम अक्रम भावुक

पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने पाकिस्तानी चाहत्यांवर निशाणा साधला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:28 PM2022-11-21T16:28:45+5:302022-11-21T16:29:39+5:30

whatsapp join usJoin us
The whole world considers me the best bowler, but in Pakistan the fixer says Wasim Akram's emotional reaction  | Wasim Akram: "संपूर्ण जग सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानते, पण पाकिस्तानात मला फिक्सर म्हणतात", वसिम अक्रम भावुक

Wasim Akram: "संपूर्ण जग सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानते, पण पाकिस्तानात मला फिक्सर म्हणतात", वसिम अक्रम भावुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जाते. 2003 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या वसीम अक्रमच्या गोलंदाजीच्या अप्रतिम कलेचे उदाहरण आजही दिले जाते. वसीम अक्रम हा केवळ पाकिस्तानातीलच नव्हे तर जगभरातील सर्व गोलंदाजांसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा जेव्हा सर्वोत्तम गोलंदाजांची चर्चा होते तेव्हा वसीम अक्रमचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. 

वसीम अक्रम भावुक 
मात्र वसीम अक्रम आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अक्रमने भावुक होत पाकिस्तानी चाहत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची सध्याची पिढी त्याला मॅच फिक्सर म्हणून संबोधते असे अक्रमने म्हटले आहे. वाइड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सशी संवाद साधताना अक्रमने म्हटले, "जेव्हा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारतातील वर्ल्ड इलेव्हनचा विचार केला जातो, जेव्हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा विचार केला जातो, तेव्हा माझे नाव नक्कीच घेतले जाते." 

मॅचफिक्सिंगच्या पसरल्या होत्या अफवा
मात्र पाकिस्तानातील आताची पिढी सोशल मीडियावर बोलते ते निंदणीय आहे. ते कोणताही विचार न करता काहीही बोलतात, अश्लील कमेंट करून ट्रोल करतात. त्यांची जवळपास प्रत्येक कमेंट अशी असते, अरे तो मॅच फिक्सर आहे. मी माझ्या आयुष्याच्या त्या भागातून बाहेर आलो आहे जिथे मी लोकांच्या कमेंट्सने दुखावलो होतो, असे अक्रमने अधिक सांगितले. 1996 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील क्राइस्टचर्चमध्ये झालेल्या सामन्यामध्ये वसीम अक्रम मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. वसीम अक्रमने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना 104 कसोटीत सामन्यांमध्ये 414 बळी घेतले आहेत. याशिवाय अक्रमच्या नावावर 356 एकिदिवसीय सामन्यांमध्ये 502 बळींची नोंद आहे.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The whole world considers me the best bowler, but in Pakistan the fixer says Wasim Akram's emotional reaction 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.