Join us  

यशस्वी जैस्वालने ठाण्यात घेतला 5BHK फ्लॅट; पदार्पणात शतक अन् कुटूंबासाठी उभं केलं हक्काचं छप्पर

यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्ध शतकाने केली. त्याने डॉमिनिकामध्ये १७१ धावांची खेळी खेळली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 3:32 PM

Open in App

2 BHK to a new 5 BHK ! यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्ध शतकाने केली. त्याने डॉमिनिकामध्ये १७१ धावांची खेळी खेळली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यशस्वी जैस्वाल जेव्हा कॅरिबियन भूमीवर शतक ठोकत होता, तेव्हा त्याचे कुटुंब डॉमिनिकापासून १३७०० किमी दूर ठाण्यातील एका नवीन घरात स्थलांतरित झाले होते.  त्याचे वडील कावड आणण्यासाठी उत्तर प्रदेशातून उत्तराखंडला गेले होते. जैस्वालने ठाण्यात नवीन पाच बेडरूमचा फ्लॅट घेतला आहे. त्यांचे कुटुंब अजूनही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. दोन वर्षांपासून हे कुटुंब येथे वास्तव्यास होते.

यशस्वी खूप दिवसांपासून नवीन घरात शिफ्ट होण्यासाठी विचारात होता. भारतात परत आल्यावर त्याला जुन्या घरात जायचे नव्हते. त्याचा भाऊ तेजस्वीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ''तो आम्हाला वारंवार सांगत होता. कृपया लवकर शिफ्ट करा. मला या घरात राहायचे नाही. कसोटी सामन्यांदरम्यानही तो आम्हाला शिफ्टिंग प्लॅन्सबद्दल विचारायचा. स्वतःचे घर असावे ही एकच इच्छा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात होती. तो कसा आणि कुठून आला हे तुम्हाला माहिती आहे. विशेषत: मुंबईत डोक्यावर छप्पर असण्याचं महत्त्व त्याला कळतं.''

यशस्वीचे वडील कावड यात्रेला निघाले आहेत. ते फोनवरच आपल्या मुलाचा स्कोअर पाहत होते आणि त्याच्या यशासाठी प्रार्थना करत होते. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्याने कुटुंबीय खूप आनंदी आहेत. तेजस्वी म्हणाली, 'हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यासाठी तो बराच काळ मेहनत करत होता. माझे वडील कावड यात्रेला गेले असून यशस्वीची प्रार्थना करत होते. माझा भाऊ कुटुंबात शांत राहतो, तो खेळावर पूर्ण लक्ष ठेवतो.

जैस्वाल अत्यंत कठीण परिस्थितीतून उभा राहिला आहे. तो यूपीतील भदोही येथून आला आणि नंतर मुंबईला शिफ्ट झाला. येथे तंबूत राहून त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आणि स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. नंतर तो भारतासाठी अंडर १९ विश्वचषक खेळला आणि आता वरिष्ठ संघाचा भाग आहे.

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारत विरुद्ध वेस्ट इंडिजठाणे
Open in App