Join us

कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द?

सामन्याआधी होणारी नाणेफेक अनेकदा सामन्याचा निकाल ठरविते. कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेकीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यजमान संघ खेळपट्टी पाहून फलंदाजी करायची की गोलंदाजी हे नाणेफेकीनंतर ठरवित असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:15 IST

Open in App

नवी दिल्ली : सामन्याआधी होणारी नाणेफेक अनेकदा सामन्याचा निकाल ठरविते. कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेकीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यजमान संघ खेळपट्टी पाहून फलंदाजी करायची की गोलंदाजी हे नाणेफेकीनंतर ठरवित असतो. आयसीसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसात कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाहुण्या संघाला झुकते माप दिले जाऊ शकते.आतापर्यंत यजमान संघाची जमेची बाब लक्षात घेत खेळपट्टी बनविली जायची. यामुळे अनेकदा कसोटी सामने एकतर्फी व्हायचे. खेळपट्टी सज्ज करताना देखील यजमान संघाचे मत विचरात घेतले जायचे. २८-२९ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार असल्याची माहिती मिळाली आहे.इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत २०१६ सालापासून नाणेफेकीला पूर्णविराम देण्यात आला. पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, इंग्लंडचा माजी खेळाडू अ‍ॅन्ड्र्यू स्ट्रॉस, श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, पंच रिचर्ड केटलबरो, सामनाधिकारी रंजन मगदुले, शॉन पोलॉक यांची समिती नाणेफेकीच्या या जटील प्रश्नावर मुंबईच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे कळते.कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफक रद्द झाल्यास सामना दीर्घकाळ चालेल शिवाय बॅट आणि चेंडूदरम्यान प्रचंड चुरस अनुभवायला मिळेल, असा दावा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने केला आहे. (वृत्तसंस्था)