Join us  

कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असावे!

‘कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असायला हवे,’ असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) क्रिकेट समितीचे सदस्य असलेले आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेने बुधवारी मांडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 3:46 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असायला हवे,’ असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) क्रिकेट समितीचे सदस्य असलेले आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेने बुधवारी मांडले. जयवर्धने यांचा समावेश असलेली आयसीसीची क्रिकेट समिती याच मुद्यावर पुढील बैठकीत चर्चा करणार आहे. आयसीसी क्रिकेट समितीचे प्रमुख, भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुबईत २७ ते ३१ मार्च या कालावधीत आयसीसीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल.लंकेचा माजी कर्णधार जयवर्धने म्हणाला,‘ वैयक्तिकरीत्या कसोटी क्रिकेटमध्ये कुठल्याही बदलास माझा विरोध आहे. आम्ही बैठकीत या विषयावर चर्चा करू. माझ्यामते कसोटी क्रिकेट चार दिवसाचे होईल, असे वाटत नाही.’ अँड्रयू स्ट्रॉस, राहुल द्रविड आणि शॉन पोलाक यासारखे माजी दिग्गज क्रिकेट समितीत आहेत.२०२३ ते २०३१ या आयसीसीच्या भविष्यकालीन क्रिकेट वेळापत्रकात कसोटी चार दिवसाची करण्याचा प्रस्ताव आहे. अनेक महान खेळाडूंनी या प्रस्तावावर टीका केली. त्यात कोहलीसह सचिन आणि पाँटिंग यांचा समावेश आहे. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया बोर्ड मात्र या प्रस्तावावर चर्चेस तयार आहे. बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांनी मात्र या प्रस्तावावर सध्या बोलणे अतिघाईचे ठरेल, असे मत नोंदविले. गुवाहाटी येथे पहिल्या टी-२० आधी कर्णधार कोहलीने स्पष्ट वक्तव्य करीत मी चार दिवसाच्या कसोटी विरोधात असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :महेला जयवर्धने