Join us  

पद्मभूषण पुरस्कार मिळणारा धोनी ठरला दहावा क्रिकेटपटू

सप्टेंबर महिन्यात बीसीसीआयने धोनीच्या नावाची यासाठी शिफारस केली होती. हे पुरस्कार एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहेत. यापूर्वी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 7:11 PM

Open in App

नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील अनेकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला पदमभूषण हा देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला.

सप्टेंबर महिन्यात बीसीसीआयने धोनीच्या नावाची यासाठी शिफारस केली होती. हे पुरस्कार एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहेत. यापूर्वी लिटिल ब्लास्टर सुनील गावसकर, कपिल देव, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रोफेसर डीबी देवधर, सीके नायडू, लाला अमरनाथ, विनू मंकड, विजय आनंद यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

यांना मिळाला आहे पुरस्कार१९५६: सीके नायडू १९५८: विजय मर्चंट१९७३: विनू मंकड १९८०: सुनील गावसकर १९९१: प्रोफेसर डीबी देवधर १९९१: लाला अमरनाथ १९९१: कपिल देव २००२: चंदू बोर्डे २०१३: राहुल द्रविड २०१८: एमएस धोनी 

टॅग्स :एम. एस. धोनीक्रिकेट