Join us  

होम ग्राऊंडवर टीम इंडियाची कसोटी; चार महिन्यात तीन संघासोबत 23 सामने

सध्या सुरू असलेल्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाचा चार महिन्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा आज बीसीसीआयनं जाहीर केली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर २३ आंतराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 7:55 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 1 - सध्या सुरू असलेल्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाचा चार महिन्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा आज बीसीसीआयनं जाहीर केली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर २३ आंतराष्ट्रीय सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका भारत दौऱ्यावर येत आहेत. आज बीसीसीआयने याची अधीकृत घोषणा केली आहे.भारत सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधात पाच वनडे आणि तीन टी 20 सामन्याची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होणरे पाच वनडे चेन्नई, बंगळुरु, नागपूर, इंदूर आणि कोलकाता येथे होणार आहेत. तर तीन टी 20 सामने हैदराबाद, रांची आणि गुवाहाटीत होणार आहेत.ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये भारत न्यूझीलंडबरोबर दोन हात करणार आहे. भारत न्यूझीलंड विरोधात तीन वनडे आणि तीन टी20 सामन्याची मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यान पुणे, मुंबई आणि कानपूरमध्ये तीन वनडे सामने होतील. तर नवी दिल्ली, कटक आणि राजकोटमध्ये तीन टी 20 सामने खेळले जातील.श्रीलंका भारत दौऱ्यावर या वर्षाखेरीस येत आहे. श्रीलंकेविरोधात भारत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तीन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्याची मालिका खेळणार आहे. कोलकाता, नागपूर आणि नवी दिल्लीमध्ये भारत श्रीलंकेविरोधात तीन कसोटी सामने खेळेल. तर धरमशाळा, मोहाली आणि वायझागमध्ये तीन वनडे सामने होतील. कोची, इंदोर आणि मुंबईमध्ये तीन टी 20 सामने होणार आहेत. डिसेंबरमध्ये ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यानंतर लगेच घरच्या मैदानावर २३ सामने खेळणार आहे. यादरम्यान भारतीय खेळाडूंना आपल्या फिटनेस सांभाळण्याचे मोठं अवाहन असेल.

या नियोजनामुळे भारतीय संघाचे वेळापत्रक भरगच्च असणार आहे. यंदाच्या मोसमात भारतातील आणखी दोन मैदानांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. यात केरळमधील 'ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम' आणि आसाममधील 'डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियम' यांचा समावेश आहे.